Crime News म्हातारपणात महिलेवर चढला प्रेमाचा रंग, 66 वर्षीय पतीची केली हत्या

After killing her husband, the wife phone called her boyfriend ; रंजना रामटेके यांनी श्याम रामटेके यांच्या हत्येनंतर त्यांना हृदयविकाराच्या झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचा बनाव रचला होता.

After killing her husband, the wife phone called her boyfriend
पतीचा खून केल्यानंतर पत्नीने प्रियकराला दिली फोन करून माहिती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 50 वर्षीय पत्नीने प्रियकराला सोबत घेऊन 66 वर्षीय पत्नीची हत्या केली
  • आईच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीला आली होती शंका
  • फोनमध्ये एक ऑडिओ रेकॉर्डिंग सापडल्याने खून झाल्याचे उघड झाले

चंद्रपूर : 50 वर्षीय पत्नीने प्रियकराला सोबत घेऊन 66 वर्षीय पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी सदर घटनेप्रकरणी 50 वर्षीय महिलेला आणि त्याच्या प्रियकराला अटक केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात सदर घटना घडली आहे. दरम्यान, हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव श्याम रामटेके असं असुन, आरोपी पत्नीचे नाव रंजना रामटेके असं आहे. रंजना रामटेके यांनी श्याम रामटेके यांच्या हत्येनंतर त्यांना हृदयविकाराच्या झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचा बनाव रचला होता. त्यानंतर आपल्या दोन्ही मुलींना वडील हृदयविकाराच्या झटक्याने मृत पावले असा निरोप फोन करून दिला. मात्र, पोलिसांना मोबाईलमध्ये 3 महिन्यांपूर्वीची एक ऑडिओ क्लिप सापडली. त्यावरून या दोघांचा पर्दाफाश पोलिसांनी केला. 6 ऑगस्ट 2022 रोजी ब्रम्हपुरी शहरातील गुरुदेव नगरात राहणाऱ्या श्याम रामटेके यांचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

अधिक वाचा '; अरे बापरे! नोकरकपातीचे वारे आता पोचले चीनमधील टेक कंपनीपर्यत

आईच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीला आली होती शंका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम रामटेके यांच्या हत्येनंतर पत्नी रंजनाने मुलींना निरोप दिला. आईचा निरोप आल्यावर दोन्ही मुली तात्काळ वडिलांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी आल्या. त्यानंतर कोणालाही आईवर शंका आली नाहीश्याम रामटेके यांचा रीतसर अंत्यविधी झाला. यानंतर आई एकटीच घरी राहत असल्याने लहान मुलगी ब्रह्मपुरी येथे राहण्यास आली. मात्र, तिला आईच्या वागण्यात बदल झाल्याचे तिच्या लक्षात आले. रंजना रामटेके यांचे आंबेडकर चौकात छोटे जनरल दुकान आहे. या दुकानाशेजारीच मुकेश त्रिवेदी या व्यक्तीचा  भाजीपाला आणि बांगडी विक्रीचे दुकान आहे. रामटेके यांच्या मृत्युनंतर मुकेशचे घरी येणे जाणे वाढले. मुकेश सतत घरी येतोय यामुके ही बाबा मुलींना खटकू लागल्यावर दोघींनी आई व मुकेश त्रिवेदी दोघांनाही समाजात बदनाम होण्याबाबत समज दिली होती. मात्र, तरीदेखील त्याचे घरी येणे जाणे सुरूच राहिले.

अधिक वाचा ; उस्मानाबादेत राष्ट्रवादीच्या आंदोलनाला कार्यकर्ते मिळेनात? 

आई एकटीच राहत असल्याने मुलीने दिला होता स्मार्टफोन

दरम्यान, वडलांचा मृत्यू झाल्याने रंजना यांच्याशिवाय दुसरे कोणीच नव्हेत. त्या एकट्याच घरी राहत असल्याने मुलीने तिला आपला स्मार्टफोन दिला होता. मात्र वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी तिने हा मोबाईल परत स्वतःकडे घेतला. त्यावेळेस मुलीला 6 ऑगस्ट रोजी पहाटे आई आणि मुकेशमध्ये दहा मिनिट संवाद झाल्याची एक ऑडिओ रेकॉर्डिंग सापडली. त्यावरून मुकेश त्रिवेदी या प्रियकराच्या मदतीने कट करून प्रथम विष पाजले व नंतर हातपाय बांधून आईने तोंडावर उशी दाबून वडिलांचा खून केल्याची माहिती मिळाली. ही ऑडिओ क्लिप ऐकून मुलीला धक्का बसला. तिने लगेच पोलीस स्टेशन गाठले. मुलीने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रंजना रामटेके आणि मुकेश त्रिवेदी यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. दरम्यान,सदर ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये पतीच्या हत्येनंतर पत्नी संजनाने त्याच्या प्रियकराला फोन करत हत्या केल्याची माहिती दिली होती. यावेळी ती हसत देखील होती. 

अधिक वाचा ; टेन्शनमुळे रात्रभर झोप येत नाहीये? मग या 5 टिप्स वापरून पाहा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी