नागपुरात तरुणांना वायुसेनेकडे आकर्षित करण्यासाठी एअर शो

नागपुरात 2 दिवसांसाठी एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे. 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी एअर फोर्सच्या मेंटेनन्स कमांड, नागपूर येथे एअर फेस्ट 2022 या नावाने हा शो आयोजित करण्यात आला आहे.

Air show to attract youth to Air Force in Nagpur
नागपुरात तरुणांना वायुसेनेकडे आकर्षित करण्यासाठी एअर शो 
थोडं पण कामाचं
  • नागपुरात 2 दिवसांसाठी एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे.
  • 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी एअर फोर्सच्या मेंटेनन्स कमांड, नागपूर येथे एअर फेस्ट 2022 या नावाने हा शो आयोजित करण्यात आला आहे.
  • झेपावणारी विमाने आणि त्यांची प्रात्यक्षिके डोळ्याची पारणे फेडणारी होती. 

नागपूर :  नागपुरात 2 दिवसांसाठी एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे. 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी एअर फोर्सच्या मेंटेनन्स कमांड, नागपूर येथे एअर फेस्ट 2022 या नावाने हा शो आयोजित करण्यात आला आहे.

वाऱ्याच्या वेगाने आकाशात झेपावणारी विमानं... त्यांची चित्तथरारक प्रत्याक्षिक आणि आपल्या वायुदलाच्या शक्तीचे याची देही याची डोळा दर्शन आज नागपुरकरांना घडलं आहे. निमित्त होते ते दोन दिवसांच्या एअर शोचे 

18 आणि 19 नोव्हेंबर रोजी एअर फोर्सच्या मेंटेनन्स कमांड, नागपूर येथे एअर फेस्ट 2022 या नावाने हा शो आयोजित करण्यात आला आहे.

नागपूरकरांनी या शोला उदंड प्रतिसाद दिला.  झेपावणारी विमाने आणि त्यांची प्रात्यक्षिके डोळ्याची पारणे फेडणारी होती.  लहान मुलांनी हा अद्भूत अनुभव घेताना प्रचंड उत्साह दाखवला.

सूर्यकिरण एरोबॅटिकचे सर्वात मोठे आकर्षण होते. या शोसाठी सर्व विमानांनी सोनेगाव एअरफोर्स स्टेशनवरून उड्डाण केले आणि लँड केले.

वायु योद्धाने आपले अप्रतिम स्टंट दाखवले, आकाश गंगा आणि एअर वॉरियर ड्रिल टीमने या शोमध्ये आपल्या धाडसी स्टंटने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी