Alcohol Addiction in women : धुळे : राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालानुसार राज्यातील धुळे (Dhule) जिल्ह्यातील मद्यपान करण्यात महिला अग्रस्थानी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, तरुणी व महिलांच्या मद्यव्यसनामध्ये राज्यात धुळे जिल्हा (३८.२ टक्के) तर पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा (३४.७ टक्के) प्रथम क्रमांक असल्याचे अहवालात समोर आले आहे. (alcohol addiction higher in female than male in dhule district national family health survey)
अधिक वाचा : PFI च्या ठिकाणांवर छापेमारी मग बजरंग दलावर कारवाई का नाही?
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालातून आणखी एक माहिती समोर आली आहे. राज्यात मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या गेल्या तीन वर्षांत दुपटीने वाढली असून सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात तर सर्वात मद्यपी पुरुष हे गडचिरोली जिल्ह्यात आहेत. मद्यपान केल्यामुळे अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाल्याचे आपण पाहत असतो. मात्र, मद्यविक्रीतून येणारा महसूल पाहता राज्य आणि केंद्र सरकारच मद्य विक्रीला प्रोत्साहन देत असल्याचे चित्र देखील समोर आले आहे. दरम्यान, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असून देखील या जिल्ह्यात व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक असल्याचे या अहवालातून उघड झाले आहे.
अधिक वाचा : ISI एजंटला पळवून-पळवून मारलं; डी गँगच्या म्होरक्याचा खात्मा
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांनी संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यासह महाराष्ट्रात दारूबंदी करा ही महाराष्ट्र दारूबंदी महिला/युवा मोर्चाची आग्रही मागणी असल्याचे गीता कोळी यांनी म्हटलं आहे. धुळे जिल्हातून पहिली दारूबंदी चळवळ ची सुरूवात झाली आहे. त्याचबरोबर धुळे जिल्ह्यात तरूणांचे व्यसनाधिन होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे देखील कोळी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, संपूर्ण धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात दारूबंदी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
अधिक वाचा ; रात्री Instagram यूजर्सं संतापले, थेट Twitter वर केली तक्रार
गीता कोळी म्हणाल्या की, राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालानुसार धुळे जिल्ह्यातील महिलांसाठी ही बाब अतिशय गंभीरतेने विचार करायला लावणारी आहे. यासाठी वेळेत व्यसनमुक्तिसाठी पाऊले उचलली न गेल्यास व धुळे जिल्हात दारूबंदी न झाल्यास भविष्यात जिल्हात पुरूषांप्रमाणे महीलांच्या आरोग्याबाबत अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होईल. जिल्ह्यात जर नागरी भागातील सधन क्षेत्रातील महिला किंवा कॉलेजच्या मुलींच्या किंवा आदिवासी भागातील महिलांच्या संदर्भात असे व्यसनाधिनतेचे वाढते प्रमाण जर अशा अहवालातून समोर आले असेल तर ही धुळे जिल्हासाठी अत्यंत धक्कादायक गंभीर बाब असल्याचे गीता कोळी यांनी म्हटले आहे.