Amaravati violence : राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय? फडणवीसांचा सवाल

नागपूर
भरत जाधव
Updated Nov 21, 2021 | 16:14 IST

Amaravati violence: 12 तारखेला जे काही घडले, जो हिंसाचार (violence) झाला त्याबद्दल सरकार मूग गिळून गप्प का बसले आहे? असा सवाल करत देवेंद्र फडणवीसांनी  (Amaravti ) हिंसाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

 Who is trying to create Anarchy in the state Question of Fadnavis
राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय?- फडणवीस  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 12 नोव्हेंबर रोजी निघालेले मोठे मोर्चे हे पूर्वनियोजित होते.
  • अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार हा 12 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया होती.
  • दंगल घडवण्याच्या हेतूने 12 तारखेच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते,

Amaravati violence: अमरावती : 12 तारखेला जे काही घडले, जो हिंसाचार (violence) झाला त्याबद्दल सरकार मूग गिळून गप्प का बसले आहे? असा सवाल करत देवेंद्र फडणवीसांनी  (Amaravti ) हिंसाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) हे अमरावती दौऱ्यावर आहेत. 

राज्यभरात एकाच दिवशी, 12 नोव्हेंबर रोजी निघालेले मोठे मोर्चे हे पूर्वनियोजित होते असा आरोपही त्यांनी केला. त्रिपुरामधे जे घडलेच नाही ते झाल्याचे दाखवून हा हिंसाचार घडवण्यात आला. जी घटना घडलीच नाही ते जनतेत घडल्याचे दाखवून अल्पसंख्याक समाजाच्या भावना भडकवण्यात आल्या. कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र, अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार हा 12 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया होती असेही फडणवीस यांनी म्हटले.

अमरावती दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी दंगलग्रस्त भागाला भेट दिली. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून पोलीस आणि प्रशासनाने त्यासाठी प्रयत्न करावे असेही त्यांनी म्हटले. सरकारने रझा अकादमीवर बंदी घालावी, अशी मागणीही फडणवीसांनी केली. अमरावतीसह राज्यातील इतर ठिकाणी काढण्यात आलेले मोर्चे हे खोट्या माहितीच्या आधारे काढण्यात आले होते. त्रिपुरात जी घटना घडली नाही, त्याचे खोट्या माहितीच्या आधारे भांडवल करण्यात आले. याच खोट्या माहितीच्या आधारे मोर्चे काढण्यात आले. राज्यात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूर्वनियोजनाशिवाय मोर्चे निघू शकत नाहीत. त्यामुळेच 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चांची चौकशी करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. सध्या सुरू असलेली कारवाई 13 नोव्हेंबरच्या घटनेवर आधारीत होत आहे. पण दंगल घडवण्याच्या हेतूने 12 तारखेच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, असा आरोप फडणवीस यांनी केला. 

अमरावतीमधील हिंसाचार ही प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांनी 13 नोव्हेंबर रोजी झालेला हिंसाचार हा 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या घटनेवर प्रतिक्रिया होती असे म्हटले. मात्र, कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही असेही फडणवीस यांनी म्हटले. अमरावतीमध्ये 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चाला परवानगी होती का, किती लोकांना परवानगी देण्यात आली, याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. दंगल भडकवण्यासाठी एका विशिष्ट समुदायाची दुकाने जाळण्यात आली असल्याचे सांगत 12 तारखेची घटना घडली नसती तर 13 तारखेची घटना घडली नसती असेही फडणवीसांनी म्हटले. 


भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण

13 नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चा प्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर एकतर्फी गुन्हे दाखल करण्यात आली असून त्यांना पोलिसांनी मारहाणही केली असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केली. खोट्या गुन्ह्यात अडकावयाचे असेल तर भाजप कार्यकर्ते जेलभरो आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी