BULDHANA | फडणवीसांना खूष करण्यासाठी काही लोकांनी सामाजिक राजकारण बिघडविण्याची सुपारी घेतली -  आमदार अमोल मिटकरी

Ahilyabai holakar nagar raw : औरंगाबाद नामांतराच्या वादानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय.

Amol Mitkari targets Gopichand Padalkar over demand change name of ahmadnagar to Ahilyabai holkar nagar
अमोल मिटकरी यांनी साधला पडळकरांवर निशाणा 
थोडं पण कामाचं
  • औरंगाबाद नामांतराच्या वादानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे.
  • अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय.
  • पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून नामांतर करण्याचं आवाहन केलं आहे

Ahilyabai holakar nagar raw । बुलढाणा : औरंगाबाद नामांतराच्या वादानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय. पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून नामांतर करण्याचं आवाहन केलं आहे. पडळकर यांनी पत्रातून शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. दुसरीकडे या पत्रावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांचा नाव न घेता तोंडसुख घेतले आहे. (Amol Mitkari targets Gopichand Padalkar over change name of ahmadnagar to Ahilyabai holkar nagar)

काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गुरुवारी ते खामगावात आले असता बोलत होते. नुकत्याच पार पडलेल्या चौंडी, अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये  पवार आजोबा-पुतण्याच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं. 

शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॅामब्लास्टचा सुत्रधार दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरदचंद्र पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॅान्च करण्याचा इव्हेंट वाटतो, असंही पडळकरांनी म्हटलं आहे. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवूंन राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' नाव बदलून 'अहिल्यानगर' करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे, असं पडळकरांनी पत्रात म्हटलं आहे. 

या या पत्रावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांचा नाव न घेता तोंडसुख घेतले आहे. काँग्रेस चे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गुरुवारी ते खामगावात आले असता बोलत होते. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी