Amravati chemist murder: कोल्हे खून प्रकरणी NIA ने 7 आरोपींना अटक

नागपूर
भरत जाधव
Updated Jul 05, 2022 | 11:32 IST

केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सातही आरोपींना ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी, आरोपींना सोमवारी अमरावती न्यायालयात हजर करण्यात आले. सातही संशयित आरोपींचा ताबा एनआयएकडे देण्यात आला आहे. त्यांना ताब्यात देण्याची मागणी सोमवारी एनआयएने न्यायालयाकडे केली होती.

  NIA arrested 7 accused in kolhe murder case
उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणी 7 जणांना अटक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • उमेश कोल्हे याने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
  • सातही संशयित आरोपींचा ताबा एनआयएकडे देण्यात आला आहे.
  • २१ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास सात उमेश कोल्हेंची हत्या करण्यात आली.

अमरावती : केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सातही आरोपींना ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी, आरोपींना सोमवारी अमरावती न्यायालयात हजर करण्यात आले. सातही संशयित आरोपींचा ताबा एनआयएकडे देण्यात आला आहे. त्यांना ताब्यात देण्याची मागणी सोमवारी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. ताबा मिळल्यानंतर आरोपींना चार दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर नेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने ताब्यात घेतल्यानंतर, एजन्सी आरोपींना 8 जुलै रोजी मुंबई न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. 
या 7 जणांना अटक करण्यात आली 

Read Also : जोरदार पावसामुळे खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पोलिसांनी मास्टरमाइंड शेख इरफान शेख रहीमसह २२ वर्षीय मुदस्सीर अहमद, २५ वर्षीय शाहरुख पठाण, २४ वर्षीय अब्दुल तौफिक, २२ वर्षीय शोएब खान आणि अतीब रशीद आणि ३२ वर्षीय युसूफ खान यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हे याने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती आणि त्या पोस्टमुळेच हा प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. केमिस्ट उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची २१ जून रोजी हत्या झाली होती. याशिवाय पोलीस याप्रकरणी शमीम अहमदचा शोध घेत आहेत. 

दरम्यान, उमेश कोल्हे यांची हत्या नूपुर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यामुळे झाल्याचे पुढे येताच या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडून होणार असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने तीन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र, सोमवारी सायंकाळपर्यंत हा तपास शहर पोलिसच करत होते. दुसरीकडे १ जुलैपासून ‘एनआयए’चे पथक शहरात आले होते व त्यांनी स्वतंत्र चौकशी सुरू केली होती. सोमवार, ४ जुलैला ‘एनआयए’चे डीआयजी व पोलिस अधीक्षक दर्जाचे अधिकारी शहरात दाखल झाले. त्यांनी सुमारे दोन तास पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्याशी चर्चा केली.

Read Also : माँ कालीच्या हातात सिगरेट, सिनेमाच्या पोस्टरवरून हंगामा

शहर पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह सात जणांना अटक केली आहे. अटकेतील आरोपींसह प्रकरणाचे संपूर्ण दस्तऐवज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सोमवारी दुपारी सुरू करण्यात आली. मंगळवारी (दि. ५) सकाळपर्यंत शहर पोलिस प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे ‘एनआयए’कडे सोपवणार असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सांगितले. आरोपींकडून तीन चाकूही जप्त करण्यात आले आहेत.

२१ जूनला काय झाले

२१ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास उमेश कोल्हे हे दुकानातून मोटारसायकलवरून घराकडे निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व मुलगा दुसऱ्या मोटारसायकलवरून निघाले होते. वाटेत उमेश कोल्हे यांना मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी अडवले व त्यातील एकाने कोल्हे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले आणि या हल्ल्यात कोल्हे ठार झाले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्यानंतर एनआयएचे पथक शनिवारी अमरावतीत पोहोचले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी