Amravati Violence: पोलिसांची धरपकड सुरू; आतापर्यंत ९० जणांना बेड्या, भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंसह महापौर गावंडेही अटकेत

नागपूर
भरत जाधव
Updated Nov 15, 2021 | 15:49 IST

Amravati Violence: अमरावती (Amravati ) बंदला हिंसक  (Violence) वळण लागल्यानंतर आता पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत दोन्ही गटातील जवळपास ९० जणांना अटक करण्यात आली.

Amravati Violence 90 people have been arrested
Amravati Violence: भाजपच्या महापौरसह तीन जणांना अटक   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सर्वाधिक उपद्रव राजकमल चौक, नमुना परिसरात झाला.
  • अमरावतीमध्ये तीन ते चार दिवस इंटरनेट सेवा बंद
  • आतापर्यंत ९० जणांना अटक करण्यात आली आहे.

Amravati Violence: अमरावती : अमरावती (Amravati ) बंदला हिंसक  (Violence) वळण लागल्यानंतर आता पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत दोन्ही गटातील जवळपास ९० जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंसह (Anil Bonde) महापौर चेतन गावंडे (Mayor Chetan Gawande) आणि भाजपचे सभागृह नेते तुषार भारतीय (BJP Leader Tushar Bhartiya) यांचाही समावेश असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे. 

त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी हिंदूत्ववादी संघटनांनी बंद पुकारला. या बंदला हिंसक वळण लागले. यात अनेक दुकानाची तोडफोड करण्यात आली. तसेच काही दुकानांना आग लावण्यात आली. सर्वाधिक उपद्रव राजकमल चौक, नमुना परिसरात झाला. रविवारी अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. शिवाय तीन ते चार दिवसांसाठी इंटरनेटसेवा देखील बंद करण्यात आली आहे. 

दरम्यान अमरावती पोलीस आता अॅक्शन मोडमध्ये आले असून शहर कोतवाली पोलिसांनी त्याप्रकरणी दोन्ही गटातील जमावाविरुद्ध जाळपोळ, दगडफेकप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत. तर खोलापुरीगेट ठाण्याच्या हद्दीत दुपारी साडेबारानंतर छत्रपुरी खिडकी परिसरात तीन व्यापारी प्रतिष्ठानांना काही उपद्रवींनी लक्ष केले. बंद प्रतिष्ठाने फोडून जवळपास सात लाखांचा ऐवज लुटल्या गेला, असे खोलापुरीगेट पोलिसांनी सांगितले. त्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटातून पोलिसांनी ९० जणांना बेड्या घातल्या आहेत. पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपचे महापौर चेतन गावंडे यांना अटक केली आहे. तसेच भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे आणि सभागृह नेते तुषार भारतीय यांना अटक केली आहे. याबाबतचे साम टीव्हीने वृत्त दिले आहे.

मशीद पाडल्याची घटना घडलेली नाही - गृह मंत्रालय

या प्रकरणावर, गृह मंत्रालयाने सांगितले की, महाराष्ट्रात हिंसाचार आणि आक्षेपार्ह भाषणबाजीच्या बातम्या आल्या आहेत, ज्याचा उद्देश त्रिपुराबाबतच्या खोट्या बातम्यांच्या आधारे शांतता आणि सलोखा बिघडवणे हा आहे. “हे अतिशय चिंताजनक आहे आणि शांतता राखण्याची विनंती केली जात आहे,” असे मंत्रालयाने म्हटले आहे. गृह मंत्रालयाने स्पष्ट केले की अलीकडच्या काळात त्रिपुरामध्ये कोणत्याही मशिदीची तोडफोड झाल्याची नोंद झालेली नाही. मंत्रालयाने हेही स्पष्ट केलं की. सोशल मीडियाच्या काही पोस्टमध्ये नमूद केल्या प्रमाणे, या घटनांमध्ये कोणतीही व्यक्ती गंभीर जखमी झालेली नाही, किंवा बलात्कार, मृत्यू झालेला नाही. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी