"देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेंना भेटायला जायचे" Eknath Shinde आणि Devendra Fadnavis भेटीबाबत अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट

Eknath Shinde and Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि सत्तांतर झालं. त्यानंतर आता या सत्तांतरामागची कहाणी समोर येऊ लागली आहे.

Amruta Fadnavis tells about secret meeting between Eknath Shinde and Devendra Fadnavis
"देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेंना भेटायला जायचे" Eknath Shinde आणि Devendra Fadnavis भेटीबाबत अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट 
थोडं पण कामाचं
  • राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एका मुलाखतीत गौप्यस्फोट 
  • एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत अमृता फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

नागपूर : शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत इतर आमदारांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत मिळून राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच शिवसेनेच्या एकनिष्ठ आणि कट्टर असलेल्या नेत्यांनी बंडखोरी केल्याने सर्वांनाच धक्का बसला. पण आता सत्तांतर झाल्यावर या सत्तांतरामागची कहाणी समोर येऊ लागली आहे. स्वत: एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भाषण करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या भेटीबाबतची एक माहिती दिली होती. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी शिंदे-फडणवीस भेटीबाबत एक गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलं, देवेंद्र साधारणत: रात्री उशीरापर्यंत काम करत असतात. त्यामध्ये मला इतकं लक्षात आलं नाही. पण रात्री चष्मा वगैरे घालून आणि जॅकेट परिधान करुन ते घरातून बाहेर पडायचे. मला सुद्धा ओळखायला यायचं नाही. मी विचारलं सुद्धा असं काय नवीन काय सुरू आहे? यावर बोलणं टाळायचे. पण मला थोडं वाटायंचं की काही ना काही सुरू आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

हे पण वाचा : "राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला पाठिंबा द्या" शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचं उद्धव ठाकरेंना पत्र

अमृता फडणवीस यांनी पुढे म्हटलं, ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं असेल एकनाथ शिंदे यांचं भाषण... त्यातून आपल्याला कळून येतं की, त्या पक्षातील सर्वच आमदार, कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता आणि ते कुठे ना कुठे निघणार होतं. त्या सर्वांना मोकळीक करुन देण्याचं काम भाजपने आणि देवेंद्र यांनी केलं आहे तर हे चांगलंच आहे.

एकनाथ शिंदेंनी सभागृहात केला होता गौप्यस्फोट

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी आणि विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी राज्य विधानसभेचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन 3, 4 जुलै रोजी पार पडलं. या विशेष अधिवेशनात भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीबाबत जाहीरपणे भाष्य केलं होतं. एकनाथ शिंदे म्हणाले होते, मी आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांना भेटत असे, हे आमच्या आमदारांना सुद्धा माहिती नव्हतं. सर्व आमदार झोपल्यावर मी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जात होतो. त्यानंतर पुन्हा सकाळ होण्यापूर्वी हॉटेलवर परत यायचो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी