नागपूर : ATM मधून ५०० रुपयांच्या ऐवजी अडीच हजार मिळू लागले, पैसे काढण्यासाठी उडाली झुंबड

ATM dispenses extra cash in Nagpur, huge crowd rushes to withdraw money : नागपूरमध्ये खापरखेडा येथे एटीएममध्ये घोळ झाला. पाचशेची एन्ट्री करून अडीच हजार मिळविण्यासाठी एटीएमसमोर झुंबड उडाली.

ATM dispenses extra cash in Nagpur, huge crowd rushes to withdraw money
नागपूर : ATM मधून ५०० रुपयांच्या ऐवजी अडीच हजार मिळू लागले, पैसे काढण्यासाठी उडाली झुंबड  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • नागपूर : ATM मधून ५०० रुपयांच्या ऐवजी अडीच हजार मिळू लागले, पैसे काढण्यासाठी उडाली झुंबड
  • एका जागरूक नागरिकाने घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली
  • पोलिसांनी एटीएम बंद केले

ATM dispenses extra cash in Nagpur, huge crowd rushes to withdraw money : नागपूरमध्ये खापरखेडा येथे एटीएममध्ये घोळ झाला. शंभरच्या पाच नोटांच्या स्वरुपात पाचशे रुपये हवे असताना पाचशेच्या पाच नोटांच्या स्वरुपात अडीच हजार रुपये मिळू लागले. ही बातमी पसरली आणि पाचशेची एन्ट्री करून अडीच हजार मिळविण्यासाठी एटीएमसमोर झुंबड उडाली. 

एका जागरूक नागरिकाने घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलीस पथक तातडीने एटीएम असलेल्या ठिकाणी पोहोचले. एटीएममधून जास्तीचे पैसे मिळत असल्याचे कळताच पोलिस सक्रीय झाले. त्यांनी एटीएम बंद केले. एटीएम केंद्राबाहेर पोलीस उभे राहिले. तातडीने बँकेच्या जवळच्या शाखेला पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती दिली. यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञ बोलावले. एटीएम यंत्राची तपासणी झाली तेव्हा चूक लक्षात आली. एटीएममध्ये नोटा ठेवण्याच्या ड्रॉवरमध्ये पैसे ठेवताना मोठी चूक झाली होती. पैसे ठेवणाऱ्याने शंभरच्या नोटांच्या ड्रॉवरमध्ये पाचशेच्या नोटा ठेवल्या होत्या. या मानवी चुकीमुळे गोंधळ झाला.

पैसे ड्रॉवरमध्ये जमा केल्यापासून ते एटीएम बंद होईपर्यंत किती जणांनी पाचशे रुपये काढले याच्या कॉम्प्युटराइज्ड नोंदी तपासण्याचे काम सुरू आहे. या नोंदींच्या आधारे पुढील कारवाई संदर्भात निर्णय घेतला जाईल. अद्याप एटीएम प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदवलेली नाही तसेच बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केलेली नाही. पण अंतर्गत तपासणी झाल्यानंतर बँक अधिकारी कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी