टेकडीवर फिरणाऱ्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; दोघांचा मृत्यू

नागपूर
भरत जाधव
Updated Apr 09, 2023 | 18:03 IST

पर्यटनासाठी ( Tourism)आलेल्या पर्यटकांसोबत (Tourists) धक्कादायक घटना घडली. चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यात वाघ मानव संघर्ष वाढलेला आहे. टेकडीवर फिरणाऱ्या पर्यटकांवर  मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Bees attack tourists walking on the hill; Both died
टेकडीवर फिरणाऱ्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मधमाशांच्या हल्ल्यात दोघांच्या मृत्यू झाल्यामुळे आता पर्यटकात मधमाशांची दहशत वाढली आहे.
  • वन्यजीवांच्या हल्ल्यात अनेकांच्या जीव गेलेला आहे.
  • मधमाशांच्या हल्ल्यात एकाच वेळी दोघांचा मृत्यू झाल्याची चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना.

चंद्रपूर : पर्यटनासाठी ( Tourism)आलेल्या पर्यटकांसोबत (Tourists) धक्कादायक घटना घडली. चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यात वाघ मानव संघर्ष वाढलेला आहे. टेकडीवर फिरणाऱ्या पर्यटकांवर  मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना तळोधी बाळापूर वनपरिक्षण केंद्र आणि तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोविंदपूर परिसरातील (Govindpur area) पेरजागड (सेव्हन सिस्टर्स हिल) या टेकडीवर घडली.( Bees attack tourists walking on the hill; Both died)

अधिक वाचा  : काही खाता बरोबर पोट फुगतं, ही गोष्ट खा मिळेल आराम

वन्यजीवांच्या हल्ल्यात अनेकांच्या जीव गेलेला आहे. मधमाशांच्या हल्ल्यात दोघांच्या मृत्यू झाल्यामुळे आता पर्यटकात मधमाशांची दहशत  वाढली आहे. मधमाशांच्या हल्ल्यात एकाच वेळी दोघांचा मृत्यू झाल्याची चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली.  मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नाव अशोक विभीषण मेंढे (वय-62)   तरम दुसऱ्या व्यक्तीचे नाव गुलाबराव पोचे (वय-58) असे आहे. जखमी असलेल्यांमध्ये सहा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. 

अधिक वाचा  : इंडिपेंडेंट मुलीला सून बनवायचं असेल तर या गोष्टी ठेवा डोक्यात

चंद्रपूर जिल्हा घनदाट जंगलाने व्यापाला आहे. येथील वाघ बघण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक चंद्रपूरला येतात. नागपूर येथील काही पर्यटक नागभीड तालुक्यातील गोविंदपूर परिसरातील पेरजागड (सेव्हन सिस्टर्स हिल) या टेकडीवर गेले होते. टेकडी फिरताना अचानक मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्याने पर्यटक बिथरले. या हल्ल्यात नागपूरचे रहिवासी अशोक विभीषण मेंढे (वय-62) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गुलाबराव पोचे (वय-58) हे  गंभीररित्या जखमी झाले होते होते. जखमी अवस्थेत त्यांना डोंगर संकुलातून गंभीर अवस्थेत उपचारासाठी हलवण्यात आले.

मात्र, मार्गतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची उशिराने वनविभागाला माहिती मिळली. वनविभागाचे पथक आणि अग्निशमन दलाच्या दोन वाहने, नागभीड पोलीस आणि स्वाब नेचर केअर संस्थेचे पदाधिकारी यांनी घटनास्थळ गाठले असून मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींच्या  मृतदेह नागभीड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी