Murder : भंडार्‍यात तरुणाचा भर रस्त्यात धारधार शस्त्रांनी खून, घटना सीसीटीव्हीत कैद

भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची भर दिवसा रस्त्यात धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.  

bhandara murder
भंडारा खून  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • एका तरुणाची भर दिवसा रस्त्यात धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे.
  • दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.  

Bhandara Murder : भंडारा : भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची भर दिवसा रस्त्यात धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.  

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरात सायंकाळच्या सुमारास एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. मृत तरुणाची ओळख पटली असून त्याचे नाव सचिन मस्के आहे. मृतक हा आरोपीच्या परिवारातील मुलगी घेऊन दोन दिवसापूर्वी पसार झाला होता. त्यावेळी तुमसर पोलीसात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती. त्यानंतर दोघेही आपआपल्या घरी घेले होते. मात्र सचिन हा फोन करून घरच्या लोकांना त्रास देत असल्याने त्यांचा राग मनात होता. हा राग मनात धरून आरोपींनी सचिनचा धारधार शास्त्राने वार करत हत्या केली आहे. आरोपी पैकी दोन जण मृतकाच्या दुचाकीवर बसून आले होते. व समोरून एक व्यक्ती हत्यात घेउन सचिनचा जवळ येत त्याच्यावर सपासप वार केला आहे. तीन जणांनी सचिनचा खून केला असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी