Bhandara Gangrape : भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणी हलगर्जीपणा केल्यामुळे दोन पोलीस अधिकारी निलंबित, महिला आयोगाच्या अध्यक्षा नागपुरात दाखल

भंडारा जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणी कारवाई करत पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी पोलीस उपनिरीक्षक, एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाला तत्काळ निलंबित केले आहे. तर एका पोलीस कर्मचाऱ्याला मुख्यालयी, अधीक्षकांना तात्काळ निलंबित केले आहे. वेळेवर कारवाई न केल्याने या पोलिसांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

थोडं पण कामाचं
  • भंडारा जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक, एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे.
  • एका पोलीस कर्मचाऱ्याची मुख्यालयात बदली केली आहे.
  • वेळेवर कारवाई न केल्याने या पोलिसांवर कारवाई

Bhandara Gang Rape : भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणी कारवाई करत पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी पोलीस उपनिरीक्षक, एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाला तत्काळ निलंबित केले आहे. तर एका पोलीस कर्मचाऱ्याची मुख्यालयात बदली केली आहे. वेळेवर कारवाई न केल्याने या पोलिसांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अधिक वाचा : Aaditya Thackeray : आज राज्यातील परिस्थिती पाहता मुख्यमंत्री कोण आहे हे कळतच नाही, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची शिंदे फडणवीस सरकारवर टीका


30 जुलै रोजी रात्री एक महिला लाखनी पोलीस ठाण्यांतर्गत भंडारा येथे घरच्यांशी भांडण करून घरातून निघून गेली. तेव्हा मदत करण्याच्या बहाण्याने एका व्यक्ति  जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.  बलात्कारानंतर तिला जंगलात सोडले. त्यानंतर पीडित महिला कशीबशी महिला एका हॉटेलजवळ पोहोचली. तेव्हा पुन्हा  दोन लोकांनी मदतीच्या बहाण्याने महिलेला जंगलात नेले आणि महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर महिला जखमी अवस्थेत रस्त्यावर पडली होती. स्थानिक नागरिकांनी तिला रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांत तक्रार केली. तेव्हा चौकशीनंतर महिलेवर बलात्कार झाल्याचे समोर आले.  या प्रकरणी हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी  पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर एका पोलीस कर्मचार्‍याची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.  

अधिक वाचा : शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत पाहु नका, आमदार कैलास पाटलांचा भाजप सरकारला इशारा

पोलिसांनी या प्रकरणी एकूण 3 जणांना अटक केली आहे.  हे प्रकरण तापत असतानाच आता या सामूहिक बलात्कारानंतर राजकारणही चांगलेच तापले आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनी पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे, तर महाराष्ट्रातील महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज नागपुरात पोहोचल्या. या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, येथे पोहोचल्यानंतर या महिलेला शासकीय योजनेंतर्गत  मदत केली जाणार आहे, तसेच अशी  घटना पुन्हा घडू नये यासाठी महिला आयोगही काम करणार आहे असे चाकणकर या वेळी म्हणाल्या. 

अधिक वाचा : Saamana Editorial :उद्धव ठाकरेंनी संपादकपदाची धुरा हातात घेताच सामनातून ममता बॅनर्जी आणि शरद पवारांवर टीका

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी