भंडारा - पोलीसांच्या सतर्कतेने दरोड्याचा प्रयत्न फसला;  सहा दरोडेखोरांना अटक  

 दरोड्याचा  प्रयत्नात असलेल्या सहा दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने भंडारा पोलिस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० मे रोजी तालुक्यातील वलमाझरी फाट्यावर जेरबंद केले.

Bhandara - Police alert foils robbery attempt Six robbers arrested
पोलीसांच्या सतर्कतेने दरोड्याचा प्रयत्न फसला 
थोडं पण कामाचं
  •  दरोड्याचा  प्रयत्नात असलेल्या सहा दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने भंडारा पोलिस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० मे रोजी तालुक्यातील वलमाझरी फाट्यावर जेरबंद केले.
  • ते दोन ते अडीच महिन्यापासून दरोडा टाकण्यासाठी रेती करत असल्याचे लक्षात आले.
  • विशेष म्हणजे या दरोडेखोरांमध्ये साकोली तालुक्यातील एका डॉक्टर पुत्राचा समावेश असून तोच मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात येत आहे.

भंडारा :  दरोड्याचा  प्रयत्नात असलेल्या सहा दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने भंडारा पोलिस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० मे रोजी तालुक्यातील वलमाझरी फाट्यावर जेरबंद केले. ते दोन ते अडीच महिन्यापासून दरोडा टाकण्यासाठी रेती करत असल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे या दरोडेखोरांमध्ये साकोली तालुक्यातील एका डॉक्टर पुत्राचा समावेश असून तोच मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात येत आहे. (Bhandara  Police alert foils robbery attempt Six robbers arrested)

अधिक वाचा : ​पंजाबमधील शिक्षकांमध्ये जेवणाच्या ताटावरून हाणामारी

सूरज रामअवतार जयस्वाल (२८) रा. संजयनगर गोविंदपूर, मिलिंद नरेंद्र गजभिये (३७) रा. कस्तुरबा वार्ड गोंदिया, रामेश्वर ज्ञानीराम वाढई (३२) रा. इंदिरा गांधी वार्ड भंडारा, अरविंद वामन डोंगरवार (४२) रा. घानोंड/ साकोली आणि कोमल रमेश बनकर (२६) रा. गोंदिया असे सहा दरोडेखोरांची नावे असून त्यांना ताब्यात घेतले आहे. साकोलीपासून १५ किलोमीटर अंतरावील एका गावात डॉक्टरच्या घरात मोठा दरोडा पडणार अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही दिवसांपुर्वी मिळाली होती.

अधिक वाचा : ​ आश्रम 3 चा टीझर रिलीज, उद्या ट्रेलर रिलीज होणार

माहितीच्या आधारे पोलिसांची चमू त्यांच्या मागावर होती. दरम्यान सोमवार ९ मे रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नागपूरवरून एक निनाव फोन आला. त्याने रात्री साकोली तालुक्यात दरोडा पडणार असल्याची शक्यता असल्याचे सांगून फोन बंद केला. त्यानुसार साकोली तालुक्यात अर्लट जारी करण्यात आली. शहरात विशेष नजर ठेवण्यात आली. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला.

अधिक वाचा : ​या सरकारी कंपनीचे शेअर्स मिळतायत खूप स्वस्त

 
नागरिकांनाही आवाहन घराबाहेरील लाईट सुरू ठेवा जागत रहा, असे म्हणत पोलिसांनी रात्रभर सायरनचा वाजवत गस्त घालत होते. दरम्यान मंगळवार १० मे रोजी वलमाझरी फाट्यावर सहा व्यक्ती मोटारसायकलवर येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून विचारपूस व सामानांची पहाणी केली असता त्यांच्याकडे लोखंडी रॉड, चाकू, मिरची पावडर आणि दोरी आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी सहाही जणांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आमगाव येथील डॉ. बाळबुध्दे यांच्या घरी दरोडा टाकणार असल्याचे सांगितले. आरोपींविरोधात साकोली पोलिस ठाण्यात कलम ४०२, ३९९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी