BJP on Nana Patole : अमरावती : काँग्रेस नेत्यांमध्ये कुत्र्यांसारखी भुंकायची स्पर्धा लागली आहे. सोनिया गांधी यांना खुष करण्यासाठी मोदींवर किती भुंकायचे याची शर्यत लागली आहे. “नाना पटोले याने तर हद्दच केली मी मालकीणीचा सगळ्यात प्रामानिक कुत्रा आहे. म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली." अशी टीका माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पार्टी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. दरम्यान, नाना पटोले यांच्यावर टीका करताना देखील भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी देखील खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. (bjp leader anil bonde criticized congress leader nana patole over modi remark)
काँग्रेसमध्ये सध्या भुंकण्याची स्पर्धा, भाजप नेते अनिल बोंडे यांची नाना पटोलेंवर टीका#NanaPatole #BJP #Congress pic.twitter.com/jBL8LmM3fC — Timesnowmarathi (@timesnowmarathi) January 18, 2022
“नानां पटोले यांनी हे लक्षात ठेवावं की,शाहिस्तेखानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल.”, असा इशारा अनिल बोंडे यांनी दिला आहे. उगीचच गमच्या मारू नको अमरावती वरून पोर निघाले आहेत पंजा सांभाळून ठेव”, असा इशारा बोंडे यांनी दिला आहे. त्याचबरोबर बोलताना बोंडे म्हणाले की, “काँग्रेस नेत्यांमध्ये कुत्र्यांसारखी भुंकायची स्पर्धा लागली आहे. सोनिया गांधी यांना खुष करण्यासाठी मोदींवर किती भुंकायचे याची शर्यत लागली आहे. नाना पटोले याने तर हद्दच केली मी मालकीणीचा सगळ्यात प्रामानिक कुत्रा आहे. म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली” असल्याचं बोंडे यांनी म्हटलं आहे.
पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा अमरावतीतून पोर निघाली आहेत. त्यांनी जपून राहावं, असा इशारा अनिल बोंडे यांनी दिला. देशाच्या पंतप्रधानांबद्दल दुसऱ्या पक्षाच्या कोणत्या प्रदेशाध्यक्षानं म्हटलंय का? नाना पटोले जर म्हणत असेल तर त्याला फटका मारला पाहिजे ना, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं आहे. आणि काँग्रेसला दुखावू नये म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी साथ देत आहे. नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदीला मारतो म्हणत असेल तर त्याला अटक टाकला पाहिजे, असही अनिल बोंडे म्हणाले.
मी आता मागील ३० वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. त्यावर आता त्यांचे स्पष्टीकरण आले आहे. या व्हिडिओनंतर भाजपने नाना पटोले यांच्या विरोधात रान उठवले आहे. विविध नेत्यांनी प्रतिक्रिया देऊन नाना पटोले यांच्या निषेध केला आहे.