Anil Bonde : नाना पटोले यांची टरकली, भाजप नेते अनिल बोंडे यांची टीका 

मी मोदीला मारू शकतो असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते, तर हा मोदी एक गावगुंड असल्याचे स्पष्टीकरण पटोले यांनी दिले होते. परंतु नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींचा अपमान केला असून नानाची टरकली अशी टीका भाजप नेते अनिल बोंडे यांनी केली आहे. 

anil bonde
अनिल बोंडे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मी मोदीला मारू शकतो असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते,
  • मोदी एक गावगुंड असल्याचे स्पष्टीकरण पटोले यांनी दिले होते.
  • नानाची टरकली अशी टीका भाजप नेते अनिल बोंडे यांनी केली आहे. 

Nana Patole : नागपूर : मी मोदीला मारू शकतो असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते, तर हा मोदी एक गावगुंड असल्याचे स्पष्टीकरण पटोले यांनी दिले होते. परंतु नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींचा अपमान केला असून नानाची टरकली अशी टीका भाजप नेते अनिल बोंडे यांनी केली आहे. 


बोंडे म्हणाले की, नागपूरच्या एका वकीलाने भंडारा गोंदियातून नाना पटोले यांना शिव्या घालणार्‍या कोणी तथाकथित गावगुंड उभा केला. या गावगुंडाला प्रश्न विचारले तर तो पळून गेला. विधानसभा अध्यक्ष राहिलेले, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल हे या गावगुंडामागे का लागले ? पटोले या गावगुंडाचा का आधार घेत आहेत? असा सवाल बोंडे यांनी उपस्थित केला.

नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांचा अपमान केला आहे, आता नाना पटोले यांची टरकली आहे.म्हणून नाना पटोले गावगुंडाच्या मागे लपून बसले आहेत, परंतु त्यांनी लक्षात ठेवावे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनता सहन करणार नाही. नानाला कोणीही वाचवू शकत नाही असेही बोंडे म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी