यवतमाळ : पूजा चव्हाण नामक एका तरुणीने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. तिच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत होती. दरम्यान, रुग्णालयात नेल्यावर तिचा मृत्यू झाला होता. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आमदार संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप केले होते. एवढेचं नव्हे तर चित्रा वाघ यांनी केलेल्या या आरोपांमुळे संजय राठोड यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. पण गेल्या दीड वर्षात पोलिसांच्या झालेल्या तपासात त्यांना क्लीन चीट मिळाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केला होता. यानंतर संजय राठोड हे पुन्हा एकदा मंत्री झाले तरीदेखील भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना विरोध केला होता. मात्र, 2 दिवसांपूर्वी वाघ यांनी राठोड यांचा विषय संपवूया, राज्यात अनेक प्रश्न आहेत असे वक्तव्य वाघ यांनी केले होते. दरम्यान, सध्या चित्रा वाघ या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणात प्रश्न विचारल्यावर चित्रा वाघ पत्रकारांवर भडकल्याचे पहायला मिळाले. त्या पत्रकार परिषेदत बोलत होत्या.
अधिक वाचा ; काँग्रेस नेत्याने महाराजांची तलवार आणण्यासाठी केली होती धडपड
दरम्यान, चित्रा वाघ या यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्याच्या आयोजित पत्रकार परिषदेत संजय राठोड प्रकरणी पत्रकारांनी चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला. यानंतर मात्र, या प्रश्नावर चित्रा वाघ एका पत्रकारवर भडकल्या. "न्याय व्यवस्था है क्या आप? मै गई हु न्यायालय मे, आप मुझको मत सिखाये. असल्या पत्रकारांना बोलवू नका. सुपारी घेऊन प्रश्न विचारतात", असं म्हणत चित्रा वाघ पत्रकार परिषदेत पत्रकारांवरच भडकल्या असल्याचे पहायला मिळाले आहे.
अधिक वाचा : तुरुंगातून बाहेर येताच फडणवीसांचं कौतुक, राऊतांच्या मनात काय
7 फेब्रुवारी 2021 रोजी बीड जिल्ह्यात राहणाऱ्या तरुणीने पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं. दरम्यान, चित्रा वाघ यानी हे प्रकरण चांगलेच उचलून धरले होते. वाघ या सतत पत्रकार परिषद घेत राठोड यांच्या नवनवीन आरोप करत होते. या प्रकरणानंतर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 28 फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा दिला. पूजा चव्हाण आत्महत्येचा पुणे पोलीस तपास करत आहेत. दरम्यान आता पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले होते. या पुराव्यात फोन रेकॉर्डिंग असून फोनवर बोलणारा व्यक्ती संजय राठोड असल्याचं सांगितलं जात होत.
अधिक वाचा : Chitra Wagh : संजय राठोड यांचा विषय संपवूया, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, चित्रा वाघ यांचे एक पाऊल मागे