Sudhir Mungatiwar : उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहू नका, भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांची टीका

Sudhir Mungatiwar : काल बुलढाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहून नका असेही टीका आज भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी केली आहे. तसेच राज्यपाल यांच्य मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपार आदर आहे असेही मुनंगटीवार म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • काल बुलढाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
  • उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहून नका असेही टीका आज भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी केली आहे.
  • तसेच राज्यपाल यांच्य मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपार आदर आहे असेही मुनंगटीवार म्हणाले.

Sudhir Mungatiwar : नागपूर : काल बुलढाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहून नका असेही टीका आज भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी केली आहे. तसेच राज्यपाल यांच्य मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपार आदर आहे असेही मुनंगटीवार म्हणाले. (bjp leader sudhir mungatiwar criticized shivsena chief uddhav thackeray)


आज नागपूर विमानतळाबाहेर मुनंगटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा मुनंगटीवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याकडे खूप गांभीर्याने पाहू नये. शिंदे गटातील नेत्यांना ते गटारातील किडे म्हणतात. मात्र ते आधी शिवसेनेचे होते. शिवसेना काही गटार आहे का? असे मुनंगटीवार म्हणाले. तसेच राज्यपाल महोदयांनी त्यांच्या विधानाचा खुलासा केला आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणे मला योग्य वाटत नाही. राज्यपालांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे. माझ्या त्या भाष्याचे कोणी चुकीचे अर्थ काढू नये. एवढं स्पष्ट राज्यपाल बोलल्यानंतर पुन्हा पुन्हा त्यावर चर्चा प्रतिक्रिया योग्य नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची भावना आहे. जोवर सूर्य चंद्र आहे पृथ्वी आहे तोवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी असणार असेही मुनंगटीवार म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी