नागपूर : मौद्यातील साळव्या येथील जंगलात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. १५ वर्षीय प्रेयसीचा चाकूने गळा चिरुन प्रियकराने हत्या केली आहे. सदर घटना बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली असून, पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. धीरज सुरेश शेंडे असं आरोपीचे नाव असून,तो १९ वर्षाचा आहे.
अधिक वाचा : उद्धव ठाकरेंना आणखी धक्का? अनेक नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत १५ वर्षीय मुलीचे प्रेमसंबंध होते. सहा महिन्यांपूर्वी आरोपीने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत मुलीचा वाद सुरु होता. ‘तुझे अन्य एका तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत’,असे म्हणून धीरजने तिच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेला. त्याने चाकूने मुलीच्या गळा चिरला यावेळी मुलीचा जाग्यावरच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अत्याचार, खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून मारेकरी प्रियकराला अटक केली.
अधिक वाचा : VIDEO: नशीब बलवत्तर म्हणून वृद्धानं मृत्यूलाही दिला चकवा
मृत मुलगी ही दहाव्या वर्गात शिकत होती. मंगळवारी सकाळी ती शिकवणी वर्गाला गेली होती. यावेळी आरोपी हा तिच्या पिछ्यावर होता. आणि याच दरम्यान आरोपीने तिला गाठले. तो तिला गोड बोलून साळव्यातील जंगलात घेऊन गेला. तिथे त्याने १५ वर्षीय मुलीवर अत्याचार देखील केला. यांनतर या दोघांचा वाद झाला आणि आरोपीने मुलीची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे.
अधिक वाचा : गौतम अदानी वाढदिवसानिमित्त करणार 60,000 कोटींचे दान
शिकवणी वर्गाला गेलेली मुलगी वेळ झाला तरी परत न आल्याने तिच्या कुटुंबातील लोकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, मुलगी मिळत नसल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. यावेळी त्यांना धीरज या मुलाबरोबर गेल्याची माहिती गावातील लोकांकडून मिळाली. कुटुंबातील लोकांनी पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तत्काळ तपास सुरु केला. आणि धीरजला पकडले. पोलिसांनी धीरजची कसून चौकशी केली असता धीरजने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर त्याने मुलीची हत्या कुठे केली ही जागा देखील दाखवली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. खुनाचा गुन्हा दाखल करून धीरजला अटक केली.