प्रियकराने अल्पवयीन मुलीची केली हत्या, कारण ऐकून थक्क व्हाल!

Boyfriend kills minor girl in wardha : पोलिसांनीआरोपी अजयची कसून चौकशी केली असता अजयने पोलिसांसमोर जे काही घडल ते सर्व कबूल केलं आहे. चार ते पाच दिवसाच्या अथक प्रयत्नांनंतर प्रकरणाचा उलगडा झाला

Boyfriend kills minor girl in wardha
प्रियकराने अल्पवयीन मुलीची केली हत्या, कारण पाहून थक्क व्हाल  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • रात्रीच्या सुमारास आरोपी प्रियकराने अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावले होते.
  • अजयने पोलिसांसमोर कबूल केला घडलेला गुन्हा
  • पीडितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा कयास लावला जात होता

वर्धा : चारित्र्यावर संशय घेऊन अल्पवयीन मुलीची प्रियकराने विहिरीत ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे घडली आहे. संशय घेण्यासाठी कुठलं न कुठलं कारण पुरेस ठरतं. याचाच प्रत्यय वर्धा जिल्ह्यात आला आहे. दुसऱ्या मित्रासोबत बोलते म्हणून सदर घटना घडली आहे. चार ते पाच दिवसांतचं पोलिसांनी सातत्याने कसून तपास करत या प्रकरणाचा हत्येचा छडा लावत पोलिसांनी आरोपीला प्रियकराला अटक केली आहे.

रात्रीच्या सुमारास आरोपी प्रियकराने अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावले होते.

अजय आणि पीडित मृत अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते. २३ जून रोजी म्हणजेच बुधवारी प्रियकराने रात्रीच्या सुमारास अल्पवयीन प्रियसीला भेटायला बोलावले होते. दोघेही लगतच्या शेतातील विहिरीजवळ पोहोचले. याचदरम्यान दुसऱ्या मित्रासोबत बोलण्याच्या कारणावरुन संशय घेत त्यांच्यात वाद सुरू झाला. बोलता बोलता त्यांचा वाद विकोपाला गेला. आणि याच दरम्यान प्रियकराचा पारा चढला आणि त्याने पीडितेला विहिरीत ढकलून दिले. आरोपी प्रियकराचे नाव अजय उर्फ गोलू गंगाधर आत्राम असून , त्याचं वय २४ वर्षे इतकं आहे. 

अजयने पोलिसांसमोर कबूल केला घडलेला गुन्हा

पोलिसांनी आरोपी अजयची कसून चौकशी केली असता अजयने पोलिसांसमोर जे काही घडल ते सर्व कबूल केलं आहे. चार ते पाच दिवसाच्या अथक प्रयत्नांनंतर प्रकरणाचा उलगडा झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी अजय याच्यावर गुन्हा नोंद केला असून त्याला अटक देखील केली आहे.

पीडितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा कयास लावला जात होता

रात्री मुलगी न दिसल्याने कुटुंबातील लोकांनी पीडित मुलीची शोधाशोध सुरू केली होती. खूप वेळ शोधून देखील मुलगी न मिळाल्याने कुटुंबातील सदस्य चिंतेत होते. कुटुंबातील व्यक्तींना पीडितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज लावला आणि ते विहिरीजवळ गेले. विहिरीजवळ गेले असता तिची ओढणी दिसून आली. मृत्यूचे कारण कळून न आल्याने पोलिसांनी सुद्धा अपघाती मृत्यू दाखल केला होता, मात्र , तपास सुरू ठेवल्याने गुन्ह्याचा उलगडा झाला. 

तांत्रिक माहिती घेऊन तपास केला असता तो नंबर अजयचा निघाला

पीडित अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली नसल्याचा संशय सुरुवातीपासूनच पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना बसत नव्हता. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या अँगलने तपास सुरू केला. गायकवाड यांनी सुरुवातीला मुलीची दप्तराची तपासणी केली यावेळी त्यांना लिहिलेल्या चिठ्ठ्या आणि मोबाईल नंबर आढळून आले. यातील एका चिठ्ठीवरील एक मोबईल नंबर दिसत नव्हता. तांत्रिक माहिती घेऊन तपास केला असता तो नंबर अजयचा निघाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आणि प्रकरणाचा छडा लावला.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी