Vidhan Parishad Election Rusult : नागपूरनंतर 'या' ठिकाणीही आघाडीला मोठा धक्का, तब्बल ८० मते फुटल्याने खळबळ

buldana-akola-washim vidhan parishad Election result : अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना ३३४ मते मिळाली. महाविकास आघाडीचे जवळपास ८० मते फुटली असल्याचे समोर आले आहे.

buldana - akola -washim vidhan parishad result , bjp win
नागपूर पाठोपाठ 'या' ठिकाणीही महाविकाआघाडीला मोठा धक्का  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तब्बल तीन टर्मपासून आमदार असलेले शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरियांचा पराभव
  • बाजोरियांचा भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी  जवळपास १०९  मतांनी पराभव
  • महाविकास आघाडीचे जवळपास ८०  मते फुटली असल्याचे समोर आले आहे

vidhan parishad Election result । अकोला : नागपूर येथे भाजपने (BJP) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का दिला आहे. त्यापाठोपाठ आता भाजपने महाविकास आघाडीला  अकोला - वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात देखील धक्का दिला आहे. तब्बल तीन टर्मपासून आमदार असलेले शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरियांचा (Gopikishan Bajoria ) पराभव करत भाजपचे वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांनी केला असल्याने खंडेवाल हे 'जायंट किलर' ठरले आहेत. शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरियांचा भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी  जवळपास १०९  मतांनी पराभव केला. भाजपने महाविकास आघाडीचे, शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा धक्कादायक पराभव करत 'बाजोरिया पॅटर्न' मोडीत काढला असल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीचे जवळपास ८०  मते फुटली असल्याचे समोर आले आहे

अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना ३३४ मते मिळाली. महाविकास आघाडीचे जवळपास ८० मते फुटली असल्याचे समोर आले आहे. वसंत खंडेलवाल यांना ४४३ मते मिळाली. त्याशिवाय ३१ मते अवैध ठरली आहेत. नितीन गडकरींचे कट्टर समर्थक वसंत खंडेलवाल यांच्या विजयासाठी भाजपने प्रयत्न केले होते
अकोल्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि नितीन गडकरींचे कट्टर समर्थक वसंत खंडेलवाल यांच्या विजयासाठी भाजपने प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.  अकोला महापालिकेसह अनेक नगरपरिषदांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ताकद वाढलेली भाजपने ही निवडणूक सर्व ताकदनिशी लढवली होती.

 

नागपूरमध्ये भाजपचा विजय

भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा विधान परिषदे (legislative council) च्या नागपूर (nagapur) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात दणदणीत विजय झाला आहे. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या मतपेढीला सुरुंग लावत अपेक्षित विजय मिळवला. बावनकुळे यांना भाजप आणि मित्रपक्षांची मते मिळालीच शिवाय त्यांनी काही महाविकास आघाडीची देखील काही मते मिळाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, भाजपने महाविकासआघाडीच्या मतांवर देखील सुरुंग लावला असचं म्हणावं लागेल.

 

महाविकास आघाडीची जवळपास १६  मते फुटली असल्याचे समोर आले

राज्याचे लक्ष नागपूरच्या निकालावर लागले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह भाजप-काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली होती. काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६  आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना एक मत मिळाले. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली  महाविकास आघाडीची जवळपास १६ मते फुटली असल्याचे समोर आले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी