बुलडाणा : शिक्षकाचा शिक्षिकेवर बलात्कार; आधी केली ओळख नंतर दाखवला चाकू आणि मग....

नागपूर
भरत जाधव
Updated May 03, 2022 | 08:00 IST

बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव शहरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने आपल्या सहकारी शिक्षिकेवर बलात्कार (rape) केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने शाळेत ये-जा करताना पीडितेसोबत ओळख निर्माण केली. आरोपीने त्याच ओळखीचा फायदा घेवून संधी साधून शिक्षिकेवर अत्याचार केला.

Buldana: Teacher rapes teacher
ओळख करत शिक्षकाने शिक्षिकेवर केला बलात्कार  |  फोटो सौजन्य: Times Now

बुलडाणा : बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव शहरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने आपल्या सहकारी शिक्षिकेवर बलात्कार (rape) केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने शाळेत ये-जा करताना पीडितेसोबत ओळख निर्माण केली. आरोपीने त्याच ओळखीचा फायदा घेवून संधी साधून शिक्षिकेवर अत्याचार केला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शिक्षक श्रीकांत वानखेडे विरोधात कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३७६ ( क), (ब) आणि ५०६ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या देखील ठोकल्या. पोलिसांचा या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव शहरात राहणाऱ्या 36 वर्षीय पीडित शिक्षिका या तालुक्यातील एका शाळेत कार्यरत आहेत. पीडित शिक्षिका ज्या गावातील शाळेत कार्यरत आहेत त्याच गावाजवळील गावातील शाळेत 46 वर्षीय आरोपी शिक्षक कार्यरत आहे. आरोपी शिक्षकाचं श्रीकांत वानखडे असं नाव आहे. पीडिता आणि आरोपी आजूबाजूच्या गावातील शाळांमध्ये कार्यरत असल्याने त्यांची खामगाव शहरापासून शाळेत जाताना भेट व्हायची. ते शिक्षकांच्या कारने खामगावरुन ये-जा करायचे. त्यातून दोघांमध्ये चांगली ओळख झाली होती.
या दरम्यान आरोपी शिक्षकाने पीडित शिक्षिकेला काहीतरी कारण सांगत निमंत्रण देत आपल्या घरी बोलावले. शिक्षिका आरोपीच्या घरी आल्यानंतर त्याने घराचे आतील दार लावले. पीडितेने यावेळी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पीडितेला काहीतरी वाईट घडणार याची जाणीव झाली. त्यामुळे तिने घराबाहेर पडण्याचा प्रचंड प्रयत्न केला. यावेळी आरोपी वानखेडेने चाकूचा धाक दाखवत पीडितेसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने पीडितेचे आपत्तीजनक परिस्थितीतले फोटो काढले. संबंधित घटनेची माहिती कुणाला सांगितली तर फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेन आणि व्हायरल करेन, अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली.
संबंधित घटनेनंतर पीडिता पूर्णपणे खचली होती. आपल्यासोबत हे काय घडलं, या विचाराने ती आतून ढासळली. अखेर या प्रकरणी आरोपी नराधमाविरोधात लढण्याचा निर्धार तिने केला. पीडितेने तातडीने शहर पोलीस ठाणे गाठत आपल्यासोबत अत्याचाराची घटना घडली याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी