खामगाव : घरात खेळता खेळता अचानक गळफास लागल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना खामगाव शहरातील मीरा नगर भागात काल सायंकाळी घडली. पूर्वेश वंदेश आवटे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पूर्वेश त्याच्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता... पूर्वेशचे वडील खासगी कंपनीत काम करतात , तर फावल्या वेळात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात... दोन वर्षांपूर्वी पूर्वेशच्या बहिणीचा सुद्धा मृत्यू झालेला आहे.. . दरम्यान काल, त्याचे वडील कंपनीत कामाला गेलेले होते तर तो आणि त्याची आई हे दोघेच घरी होते.. . त्यावेळी बाहेर खेळायला जातो असे म्हणून तो घराच्या मागे गेला होता .. तिथे असलेल्या लोखंडी पाईपला त्याने रुमाल बांधला आणि त्याच्यासोबत तो खेळत होता.. . खेळता खेळता अचानक त्याला फास लागला... ही बाब त्याच्या आईच्या लक्षात आल्यानंतर आईने त्याला खाली उतरवले.... त्याच्या वडिलांना बोलल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून पूर्वेशला मृत घोषित केले..
पूर्वेशला मोबाईलवर युट्यूबवर गेम खळण्याची आवड होती, त्यामध्ये साहसी व्हिडिओ पाहून तसेच काहीतरी करण्याचा त्याचा सतत चा प्रयत्न होता, कदाचित या छंदामुळेच त्याला गळफास लागला असावा अशी चर्चा शहरात आहे.