Buldhana Accident: पोलीस भरतीची तयारी करताना दोन तरुणांचे हातच तुटले, नेमकं काय घडलं?

नागपूर
Updated Sep 16, 2022 | 12:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Buldhana bus accident: बुलढाण्यात एका बस अपघातात दोन तरुणांना त्यांचे दोन्ही हात गमवावे लागल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे दोन्ही तरुणांचं पोलीस होण्याचं स्वप्न कायमचं भेगलं आहे.

buldhana two youths preparing for police recruitment lost both their hands in a bus accident
पोलीस भरतीची तयारी करताना अक्षरशः दोन तरुणांचे हात तुटले   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पहाटे लवकर उठून व्यायाम करणाऱ्या तरुणांसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली
  • बसच्या तुटलेल्या पत्र्याचा धक्का लागून तरुणांचे दोन्ही हात तुटले
  • प्रकृती गंभीर असल्याने दोन्ही तरुणांना जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे

Buldana Accident: बुलढाणा: अंगावर खाकी वर्दी घालण्याचे स्वप्न बाळगून चिकाटीने मेहनत करणाऱ्या दोन तरुणांचे स्वप्न नियतीने त्यांच्यापासून अत्यंत क्रूरपणे हिरावून घेतलं आहे. पोलीस भरतीसाठी पहाटे लवकर उठून व्यायाम करणाऱ्या तरुणांसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस (police) भरतीची तयारी करणाऱ्या दोन तरुणांना बसचा धक्का लागून झालेल्या अपघातात त्यांचे दोन्ही हात अक्षरशः तुटून पडले आहेत. सदर घटनेने तरुणांचे पोलीस भरतीचे स्वप्न अपूर्ण राहणार असेच दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana district) मलकापूर पिंपळगाव देवी मार्गावर सकाळी ही घटना घडली आहे. सदर तरुण हे रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीसाठी व्यायाम करत होते. यादरम्यान, ही घटना घडली आहे. सदर घटनेने मोठी खळबळ उडाली असून, तरुणांना धक्का देणाऱ्या बसच्या चालकावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. (hands of 2 youths cut of in bus accident)

अधिक वाचा : अर्धी दाढी झाल्यावर न्हाव्याने चिरला ग्राहकाचा गळा, नंतर..

बसच्या तुटलेल्या पत्र्याचा धक्का लागून तरुणांचे दोन्ही हात तुटले

मिळलेल्या माहितीनुसार, विकास गजानन पांडे आणि परमेश्वर पाटील अशी या दोन्ही तरुणांची नावं आहेत. पोलीस व्हायचंय हे स्वप्न उराशी बाळगून पहाटेच्या सुमारास सदर तरुण हे व्यायामाला निघाले होते. मात्र, याचं मार्गावरून मलकापूर आगाराची बस जात होती. या बसच्या बाजूचा पत्र तुटला होता. या तुटलेल्या पत्र्याचा तरुणांना जोरात धक्का लागला आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोन तरुणांचे हात अक्षरशः तुटून पडले.

अधिक वाचा: घाण पसरवू नका... व्हायरल Video मधील ती शिक्षिका भडकली 

प्रकृती गंभीर असल्याने दोन्ही तरुणांना जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे

विकास आणि परमेश्वर या दोघांना या अपघातात गंभीर मार देखील लागला आहे. घटना घडल्यानंतर दोघांना तत्काळ मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. मात्र दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या बस चालकाने बस धामणगाव बढे पोलीस स्थानकात उभी केली असून बस चालक पोलीस स्थानकात आहे. बस ड्रायव्हरच्या चुकीमुळे सदर तरुणांना आपले हात गमवावे लागले असल्याने सदर बस ड्रायव्हरवर कडक कारवाई करावी अशी मागणी दोन्ही तरुणांच्या नातेवाईकांनी केली आहे.

अधिक वाचा ; Alert..! पुढील 3 ते 4 मुंबई ठाण्यात तुफान पावसाचा इशारा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी