दुर्दैवी !, पीक कापणीचे काम उरकून परतणाऱ्या मजूरांच्या गाडीचा भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू

Bus and car accident । अमरावती जिल्ह्यातून परतणाऱ्या मजुरांच्या गाडीचा समोरासमोर झालेल्या धडकेत 11 मजुरांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Bus and car accident! 11 killed including 5 members of the same family
दुर्दैवी !, पीक कापणीचे काम उरकून परणाऱ्या मजूरांच्या गाडीचा भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अमरावतीहून परतणाऱ्या मजुरांचा गुरुवारी रात्री उशिरा भीषण अपघातात .
  • दोन मुलांसह सर्व 11 जण जागीच ठार झाले.
  • घटनास्थळापासून या गावाचे अंतर फक्त एक किलोमीटर आहे.

अमरावती : शेतातील पीक कापणीचे काम उरकून अमरावतीहून मध्यप्रदेशाला घरी परतणाऱ्या मजूरांच्या कारचा अमरावती-बैतूल महामार्गावj  गुरुवारी रात्री उशिरा अपघात झाला. या भीषण अपघातात 11 मजुरांचा मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत. (Bus and car accident! 11 killed including 5 members of the same family)

अधिक वाचा : Kartiki Ekadashi : उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न, विठ्ठलाकडे मागितला आशीर्वाद अन् सुबुद्धी

सर्व मजूर हे गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये शेतमजुरी करण्यात आले होते. खरीप हंगामातील पिकांची कापणीचे काम संपल्यानंतर हे मजूर गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सर्व लोक मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील झाल्लार गावाच्या दिशेने तवेरा कारमधून निघाले.  रात्री दोन वाजता मजुरांचे गाव झाल्लार अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असतानाच ड्रायव्हरची डुलकी लागली. त्यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार समोरून येणाऱ्या बसला धडकली. या अपघातात कारमधील 11 जणांचा मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चालकाची प्रकृती गंभीर आहे. अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्ण चक्काचूर झाला. त्यामुळे कारमधील मृतदेह कार कापून बाहेर काढावे लागले.

अधिक वाचा : Amruta Fadanvis : भिडे गुरूजी हिंदुत्वाचा स्तंभ त्यांनी महिलांचा आदर करावा - अमृता फडणवीस

अपघाताबाबत माहिती देताना बैतुलचे एसपी सिमला प्रसाद म्हणाले की, बेतुलच्या झाल्लार येथून २० दिवसांपूर्वी सर्व लोक अमरावतीच्या एका गावात कामावर गेले होते, गुरुवारी रात्री सर्व लोक अमरावतीहून झाल्लारकडे निघाले होते. रात्री दोन वाजता झाल्लार पोलीस ठाण्याजवळ हा अपघात झाला. अपघात खूपच भीषण होता, दोन मुलांसह सर्व 11 जण जागीच ठार झाले. सर्व मृतांचे मृतदेह झाल्लार प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. सर्व मृता झाल्लार गावातील रहिवासी होते. 

 या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी शोक व्यक्त कर सर्व 11 मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींच्या पुढच्या व्यक्तींना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी