'अजित पवारांचा अपमान', राष्ट्रवादीने नागपुरात केला गोंधळ, बसेसही रोखल्या

Buses blocked by NCP workers in Nagpur : अजित पवार यांचे भाषण झाले नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात निदर्शने केली, नागपुरातील गणेशपेठ येथे ही निदर्शने झाली, जिथे शहराचे मुख्य बसस्थानक आहे, येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसलेल्या सर्व बसेस अडवून रास्ता रोको केला.

Buses blocked by NCP workers in Nagpur
'अजित पवारांचा अपमान', राष्ट्रवादीने नागपुरात केला गोंधळ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मोदींच्या मंचावर अजित पवारांना भाषणाची संधी न दिल्याने राष्ट्रवादी आक्रमक
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसलेल्या सर्व बसेस अडवून रास्ता रोको केला
  •  हा संपूर्ण अपमान असून हा त्यांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचाही अपमान – कार्यकर्ते

नागपूर : आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर होते, या कार्यक्रमाच्या मंचावर पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले, तर  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले नाही. अजित पवार यांचे भाषण झाले नसल्याने आता राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे.

अधिक वाचा : पाकिस्तानात अडकून आहेत २ मुली आणि पत्नी, रत आणण्यासाठी धडपड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसलेल्या सर्व बसेस अडवून रास्ता रोको केला

अजित पवार यांचे भाषण झाले नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात निदर्शने केली, नागपुरातील गणेशपेठ येथे ही निदर्शने झाली, जिथे शहराचे मुख्य बसस्थानक आहे, येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसलेल्या सर्व बसेस अडवून रास्ता रोको केला. बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती त्यानंतर पोलिसांनी या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तेथून हटवून वाहतूक सुरळीत केली आहे.

अधिक वाचा : बेरोजगारीचा काळ दाखवणारं मोदी सरकार देणार 10 लाख नोकऱ्या 

 हा संपूर्ण अपमान असून हा त्यांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचाही अपमान – कार्यकर्ते

 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान मोदींच्या मंचावर ज्या प्रकारे बोलू दिले गेले नाही, हा संपूर्ण अपमान असून हा त्यांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचाही अपमान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा : नवनीत राणा यांनी अमरावतीत महिलांसोबत केले वटसावित्री पूजन 

दादाला जर बोलायला दिले नसेल तर,मला अयोग्य वाटत आहे – सुप्रिया सुळे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंचावर बोलू न दिल्याने सुप्रिया सुळे यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे. दादा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. आणि प्राईम मिनिस्टरचा प्रोटोकॉल दादाला असतो. त्यामुळे अर्थातच दादाला हजर राहणं हे गरजेचं आहे. ज्या ज्या जिल्ह्यात माननीय प्रधानमंत्री येतील त्या त्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांना जावच लागत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दादाने जायलाच पाहिजे ह्या मताची मी आहे. पण दादाला जर बोलायला दिले नसेल तर, मला अयोग्य वाटत आहे. दादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राज्याचे उपुख्यमंत्री आहेत. मला माहिती काढावी लागेल. मी माहिती काढते आणि प्रेस कॉन्फरन्स संपायच्या आधी उत्तर देते. असंही सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी