Akola Accident : अकोल्यात नदीच्या पुलाचे कठडे तोडून गाडी कोसळली नदीत, क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यास यश

अकोला जिल्ह्यात सुरू असल्या सतातधार पावसाने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने रस्त्याचा अंदाज येणे तसे कठीण होत आहे. नदीच्या पुलावरून वाहन चालवताना अंदाज न आल्याने चारचाकी वाहन तब्बल ५० फूट खोल नदीत कोसळल्याची घटना म्हैसांग येथे घडली आहे.

थोडं पण कामाचं
  • अकोला जिल्ह्यात सुरू असल्या सतातधार पावसाने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.
  • नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने रस्त्याचा अंदाज येणे तसे कठीण होत आहे.
  • नदीच्या पुलावरून वाहन चालवताना अंदाज न आल्याने चारचाकी वाहन तब्बल ५० फूट खोल नदीत कोसळल्याची घटना घडली आहे.

Akola Car Accident : अकोला :  अकोला जिल्ह्यात सुरू असल्या सतातधार पावसाने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने रस्त्याचा अंदाज येणे तसे कठीण होत आहे. नदीच्या पुलावरून वाहन चालवताना अंदाज न आल्याने चारचाकी वाहन तब्बल ५० फूट खोल नदीत कोसळल्याची घटना म्हैसांग येथे घडली आहे.

म्हैसांग मार्गे अकोला अमरावती हा रस्त चांगला झाला असल्याने वातुकीची वर्दळ या रस्त्यावर वाढली आहे. या रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या गाड्या व होणारे अपघात ही नित्याची बाब बनली असून काल मध्य रात्रीच्या दरम्यान अकोला येथून अमरावतीकडे भाजी घेऊन जात असलेला एम एच ३० बी डी हे पीकअप वाहन म्हैसांग येथील पूर्णा नदीच्या पुलाचे कठडे तोडून हे वाहन थेट ५० फूट खोल नदीत पडले. गाडीचे टायर अचानक फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघातात झाला. या अपघातात सचिन वामन मालठे व विशाल श्रीनाथ दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना गावकऱ्यांच्या मदतीने तत्काळ अकोला सर्वोपचार रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी