Kanhaiya Kumar : भाजप नेते नितीन गडकरींवरही सीबीआयची धाड पडेल, काँग्रेस नेता कन्हैया कुमारची टीका

देशात सरकारी संस्थांचा गैरवापर होत आहे असे विधान काँग्रेस नेते कन्हैया कुमार याने केले आहे. तसेच मला तर भिती आहे उद्या नितीन गडकरींवरही सीबीआयची धाड पडेल असेही कन्हैया कुमार म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • देशात सरकारी संस्थांचा गैरवापर होत आहे असे विधान काँग्रेस नेते कन्हैया कुमार याने केले आहे.
  • तसेच मला तर भिती आहे उद्या नितीन गडकरींवरही सीबीआयची धाड पडेल असेही कन्हैया कुमार म्हणाले.
  • नागपुरात काँग्रेसने आयोजित केलेल्या टेक्नो रॅलीसाठी कन्हैया कुमार उपस्थित राहणार आहे.

Kanhaiya Kumar : देशात सरकारी संस्थांचा गैरवापर होत आहे असे विधान काँग्रेस नेते कन्हैया कुमार याने केले आहे. तसेच मला तर भिती आहे उद्या नितीन गडकरींवरही सीबीआयची धाड पडेल असेही कन्हैया कुमार म्हणाले. (cbi may raid bjp leader nitin gadkari congress leader Kanhaiya Kumar criticized bjp)

अधिक वाचा :  "आता मुख्यमंत्री घरी बसणार नाहीत, तुम्हालाही घरी बसू देणार नाही" फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

नागपुरात काँग्रेसने आयोजित केलेल्या टेक्नो रॅलीसाठी कन्हैया कुमार उपस्थित राहणार आहे. त्यापूर्वी कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. कुमार म्हणाले की, आजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे जयंती आहे. राजीव गांधी यांनी भारतात कॉम्प्युटर क्रांती आणली. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस आज देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. नागपुरात काँग्रेसने रॅली आयोजित केली आहे. या रॅलीचे नाव वेगळे नाव आहे. या रॅलीचे नाव टेक्नो रॅली ठेवण्यात आले आहे. जे लोक हा देश विकत आहेत त्यांना शुद्धीवर आणायचे आहे. सध्या देशापुढे महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न उभे आहेत. तसेच देशातील विविध संस्थांचा दुरुपयोग सुरू आहे, त्याविरोधात आम्ही या रॅलीचे आयोजन केले आहे असे कन्हैया म्हणाले.

अधिक वाचा : Maharashtra Rain: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचं वादळात रुपांतर, राज्यात पावसाचा जोर वाढणार

तसेच सरकारी संस्था या देशाच्या सुरक्षेसाठी आहेत. परंतु सध्याचे सरकार आपल्या खुर्चीच्या सुरक्षेसाठी या संस्थांचा गैरवापर करत आहे. परंतु प्रत्येक गोष्टीची वेळ असते, जी गोष्ट बरोबर आहे ती चुकीची सिद्ध होऊ शकत नाही. मला तर भिती आहे की भाजप नेते गडकरींवरही सीबीआय आयची धाड पडेल असेही कन्हैया कुमार म्हणाले.

अधिक वाचा : Mumbai Police: मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला आलेल्या मेसेजनं खळबळ, पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला?; बंदोबस्त वाढवला

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी