नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल

Changes in examination schedule of Nagpur University : नागपूर विद्यापीठाच्या २५ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार असलेल्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक गुरुवार २१ एप्रिल २०२२च्या बैठकीत ठरविले जाईल.

Changes in examination schedule of Nagpur University
नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल 
थोडं पण कामाचं
  • नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
  • नागपूर विद्यापीठाच्या २५ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार असलेल्या परीक्षा पुढे ढकलल्या
  • परीक्षेचे सुधारित वेळापत्रक गुरुवार २१ एप्रिल २०२२च्या बैठकीत ठरविले जाईल

Changes in examination schedule of Nagpur University: नागपूर : नागपूर विद्यापीठाच्या २५ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार असलेल्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक गुरुवार २१ एप्रिल २०२२च्या बैठकीत ठरविले जाईल. निर्णय घेण्यासाठी  नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा आणि मुल्यांकन मंडळाची बैठक गुरुवार २१ एप्रिल २०२२ रोजी होणार आहे. 

नियमानुसार परीक्षा सुरू होण्याच्या किमान पंधरा दिवस आधी वेळापत्रक जाहीर करण्याचे बंधन नागपूर विद्यापीठावर आहे. या नियमाचे पालन करून सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे संकेत नागपूर विद्यापीठाने दिले आहेत.

याआधीही नागपूर विद्यापीठाने महत्त्वाच्या परीक्षा सुरू होण्याच्या काही दिवस आधी पुढे ढकलल्याच्या घटना घडल्या आहेत. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर इतर विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे अशांचे परीक्षेच्या वेळापत्रकातील बदलामुळे नुकसान होण्याचा धोका आहे. 

नागपूर विद्यापीठाने २५ एप्रिल पासून परीक्षा घेणार असे जाहीर केले. पण या परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर केले नव्हते. यामुळे २५ एप्रिलपासून सुरू होणार असलेली परीक्षा पुढे ढकलली जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. अखेर ही शक्यता प्रत्यक्षात उतरली आहे. 

नॅशनॅलिस्ट स्टुडंट्स युनियन आणि एनएसयूआय या विद्यार्थी संघटनांनी यंदाच्या वर्षी परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी केली आहे. अद्याप या मागणीवर नागपूर विद्यापीठाचा निर्णय जाहीर झालेला नाही.आता २०२२ची परीक्षा ऑनलाइन आणि २०२३ची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होईल, अशी चर्चा आहे. मात्र अधिकृतरित्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी