Chitra Wagh : संजय राठोड यांचा विषय संपवूया, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, चित्रा वाघ यांचे एक पाऊल मागे

पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश करून पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली होती. राठोड यांच्या विरोधातील लढा कायम राहिल असे विधान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले होते. आता राठोड यांचा विषय संपवूया, राज्यात अनेक प्रश्न आहेत असे वक्तव्य वाघ यांनी केले आहे.

chitra wagh
चित्रा वाघ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
  • परंतु राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश करून पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
  • राठोड यांच्या विरोधातील लढा कायम राहिल असे विधान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले होते.

Chitra Wagh : अमरावती : पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश करून पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली होती. राठोड यांच्या विरोधातील लढा कायम राहिल असे विधान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले होते. आता राठोड यांचा विषय संपवूया, राज्यात अनेक प्रश्न आहेत असे वक्तव्य वाघ यांनी केले आहे. (chitra wagh backfoot on sanjay rathod case will fighting in courts)

अधिक वाचा : Uddhav Thackeray : संजय राऊत यांना एखाद्या प्रकरणात गोवून पुन्हा अटक करतील, उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली शंका

एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी वाघ यांना राठोड यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता वाघ म्हणाल्या की, संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना क्लीनचिट दिली होती, त्यांना हा प्रश्न विचारा. तेव्हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील होते त्यांना हा प्रशन विचारा इतकेच काय पुण्याचे पोलीस आयुक्त यांनाही राठोड यांना प्रश्न विचारा. यात मी कुठलीही पळवाट काढत नाही. जर कोर्टात जाणे पळवाट असेल तर सध्या राज्यात प्रत्येक जण पळवाट काढत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना क्लीन चिट दिल्याचे म्हटले आहे. राठोड यांच्याबद्दल मी प्रश्न  दररोज विचारत असते, माझा लढा सुरू आहे. न्यायव्यवस्थेवर सगळ्यांचा विश्वास आहे. न्यायालयातून मला न्याय मिळेल अशी मला खात्री आहे. कोर्टात आम्ही सर्व पुरावे सादर केले आहेत. मंत्री असो वा नसो मी माझी लढाई लढणारच असेही वाघ म्हणाल्या.

अधिक वाचा :  Bharat Jodo Yatra भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे 'या' नेत्यांसह भारतीय रणजी क्रिकेट संघाच्या महिला खेळाडूही होणार सहभागी

पूजा चव्हाण मृत्यू

पुण्यात पूजा चव्हाण या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पूजाच्या मृत्यूसाठी संजय राठोड जबाबदार आहेत असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. भाजपने वाघ यांची बाजू उचलून धरली होती तसेच राठोड यांचा राजीनामा मागितला होता. वाढता विरोध पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी