अमरावतीत कॉलराचा कहर! 8 दिवसात 181 रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

नागपूर
भरत जाधव
Updated Jul 14, 2022 | 08:33 IST

राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दररोज आढळत आहेत, त्यात पावसाने थैमान घातल्याने अनेक ठिकाणी पूर आले आहेत. पूर ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी रोगराई पसरण्याची शक्यता आहे, अशात अमरावती येथे कॉलराने (Cholera) कहर माजवला आहे. 8 दिवसात कॉलराचे 181 रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आहे. यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

Cholera outbreak in Amravati, 5 people died
अमरावतीत कॉलराचा कहर, 5 जणांचा मृत्यू (संग्रहित फोटो )  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांना कॉलरची लागण झाली आहे.
  • प्रत्येकाची वैयक्तिक वैद्यकीय तपासणी करून त्याला होणाऱ्या नुसार त्यांना औषधोपचार
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना फोन

मुंबई :  राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दररोज आढळत आहेत, त्यात पावसाने थैमान घातल्याने अनेक ठिकाणी पूर आले आहेत. पूर ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी रोगराई पसरण्याची शक्यता आहे, अशात अमरावती येथे कॉलराने (Cholera) कहर माजवला आहे. 8 दिवसात कॉलराचे 181 रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आहे. यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

5 जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन अलर्ट मोडमध्ये आले आहे. याबाबत माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले म्हणाले की, दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांना कॉलरची लागण झाली आहे. यासाठी प्रत्येकाची वैयक्तिक वैद्यकीय तपासणी करून त्याला होणाऱ्या नुसार त्यांना औषधोपचार करण्यात येत आहे. तर प्रत्येकाला ओ आर एस पावडर दिल्या जात आहेत. घटनेचे मूळ कारण शोधल्यानंतर गावात सध्या मोठ्या प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

मेळघाटमध्ये दूषित पाणी प्यायल्याने तिघांचा मृत्यू, 47 जण गंभीर

जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाच डोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने 50 जणांची प्रकृती खराब झाली होती. या सगळ्यांना डायरिया झाल्याचे निष्पन्न झाले होते. यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. तर 47 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. आता या प्रकरणातील बाधितांची संख्या ही 231 इतकी झाली आहे

मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

या घटनेची बातमी कळताच दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून त्याच्याशी संवाद साधला होता. या सर्वांवर तातडीने उपचार करावेत. तसेच, गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असली तरीही उर्वरित लोकांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरून दिली. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी