मुलीची छेड काढण्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू

Clash between two groups due to teasing of girl, one dies : सदर घटनेसंदर्भात निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या चौघा जणांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले असून, सध्या पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली आहे. त्याचबरोबर कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

Clash between two groups due to teasing of girl, one dies
मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, एकाचा मृ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी
  • हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडली आली
  • निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News Dhule Sakri धुळे : मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली आणि या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात निजामपूर जैताणे या गावात रात्रीच्या सुमारास घडली आहे. दोन गटात सुरू झालेला वाद वाढत गेला आणि या वादाचे रुपांतर हाणामारी झाले. या हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. जखमीवर सध्या शासकीय रुग्णालयामध्ये  उपचार सुरू असून, याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा : मॉलच्या फूड कोर्टमध्ये गोळीबार, 4 लोकांचा मृत्यू; अनेक जखमी

निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सदर घटनेसंदर्भात निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या चौघा जणांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले असून, सध्या पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली आहे. त्याचबरोबर कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, याची काळजी पोलीस प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे.

अधिक वाचा ; राज्यात अतिवृष्टीचा तडाखा; मुसळधार पावसानं घेतले 104 जणांचे

पोलीस प्रशासनातर्फे तात्काळ फौजफाटा तैनात केला

 मिळालेल्या माहितीनुसार, मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून दोन गटात सुरुवातीला बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीमध्ये  झाले. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घातली आणि परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली आहे.

अधिक वाचा ; महाराष्ट्रात मविआ सरकारच्या काळात २२ हजार ७५१ बालमृत्यू  

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवणार नाही; अशी भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली होती

निजामपूर पोलीस ठाण्याच्या बाहेर मृताच्या नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीचा मृतदेह काही काळ आणून ठेवला होता. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाहीत अशी भूमिका मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केली होती. मात्र, पोलीस प्रशासनातर्फे तात्काळ संबंधितांना अटक करण्यात आल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी