Samruddhi Mahamarg : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी, फडणवीस यांच्या हाती होते स्टेअरिंग 

Samruddhi Highway : येत्या काही दिवसात हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाची पाहणी केली.

थोडं पण कामाचं
  •  येत्या काही दिवसात हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.
  • त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाची पाहणी केली.
  • वर्धा जिल्ह्यात समृद्धीचा 55 किलोमीटरचा मार्ग आहे.

Samruddhi Highway : वर्धा : येत्या काही दिवसात हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्टेअरिंग हाती घेत गाडी चालवली आणि मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या बाजूला बसले होते. (cm eknath shinde and deputy cm devendra fadanvis visit samruddhi highway in wardha)

नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तेथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पाहणी दौरा सुरु केला. वर्धा जिल्ह्यात समृद्धीचा 55 किलोमीटरचा मार्ग आहे. या संपूर्ण मार्गात प्रवास करत मार्गाची पाहणी करण्यात आली.  वर्धा जिल्ह्यात महामार्गावर दोन टोल प्लाझा देण्यात आले आहे. यापैकी विरुळ येथे टोल प्लाझा व परिसराची त्यांनी पाहणी केली. 

वर्धा जिल्ह्यात 55 किमीचा मार्ग

वर्धा जिल्ह्यात सेलू, वर्धा व आर्वी या तालुक्यातून महामार्ग जात आहे. वर्ध्यात एकुण 55 किमी लांबीचा हा महामार्ग आहे. महामार्गाची रुंदी 120 मीटर असून सदर मार्ग 6 पदरी आहे. मार्गावर 5 मोठे व 27 लहान अशा 32 पुलांचा समावेश आहे. महामार्गावरील वाहतुक विना अडथळा होण्यासाठी 9 ठिकाणी उड्डान पूल उभारण्यात आले आहे. येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेस देण्यात आले आहे. वन्यप्राण्यांचा संचार असलेल्या भागात दोन ठिकाणी उन्नत मार्ग आहे. महामार्गासाठी 782 हेक्टर जमीनीचे अधिग्रहन करण्यात आले आहे तर 2 हजार 762 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी