Gadchiroli Flood : गडचिरोलीतील पुराचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवाना 

राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली रवाना झाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार्टर प्लेनने नागपूरला पोहोचले आणि तेथून ते हेलिकॉप्टरने गडचिरोलीला जाणार होते पण खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर गडचिरोलीला जाऊ शकले नाही, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रस्त्याने प्रवास करत गडचिरोलकडे रवाना झाले.

थोडं पण कामाचं
  • राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली रवाना झाले आहेत.
  • आमची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे,
  • पुरामुळे काहीही झाले तरी जिथे संपर्क असेल तिथे काळजी घेतली जात आहे

Gadchiroli Flood : नागपूर : राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली रवाना झाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चार्टर प्लेनने नागपूरला पोहोचले आणि तेथून ते हेलिकॉप्टरने गडचिरोलीला जाणार होते पण खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर गडचिरोलीला जाऊ शकले नाही, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रस्त्याने प्रवास करत गडचिरोलकडे रवाना झाले. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अनेक ठिकाणी पाणी आहे, आम्ही विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेतली, सर्व अधिकारी तत्काळ कारवाई करण्याच्या तयारीत आहेत, कोणतेही नुकसान होऊ नये. गडचिरोलीतील पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले.तिथे अधिका-यांना सांगण्यात आले असून, त्यात कोणतीही कमतरता भासणार नाही, आमची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, कोणत्याही परिस्थितीत कोणतीही अडचण येऊ नये, पूर आल्याने  पानी लोकांच्या घरात घुसू नये, सर्व व्यवस्था केली जात आहे, सर्व जिल्हा अधिकारी, विभागीय आयुक्त, पुरामुळे काहीही झाले तरी जिथे संपर्क असेल तिथे काळजी घेतली जात आहे असे शिंदे म्हणाले. 

तसेच गडचिरोलीत पूर आल्याने मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणीसाठी आलो आहोत. या पाहणीनंतर सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली जाईल अशी माहिती शिंदे यांनी दिली. गडचिरोलीत सर्व यंत्रणा अलर्ट आहेत. गडचिरोलीत पुरामुळे कुठलीही जिवीतहानी होऊ यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. गडचिरोलीत एसडीआरएफसह स्थानिक यंत्रणा नैसर्गिक संकटाला सामोरं जाण्यासाठी तयार आहेत. यात कुठलीही प्राणहानी होणार नाही यासाठी आमची प्राधान्य आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे. फक्त गडचिरोलीच नव्हे तर संपूर्ण राज्यात यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत त्यांचा आम्ही आढावा घेत आहोत असेघी मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी