हिंगोलीच्या सभेत CM शिंदेंनी टाकलं आश्वासनच हिंग; विविध विभागांतील 80 हजार पदे भरणार, शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत देणार

नागपूर
भरत जाधव
Updated Aug 09, 2022 | 07:34 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सोमवारी मराठवाड्याच्या (Marathwada) दौऱ्यावर होते. हिंगोली (Hingoli)मध्ये जाहीर सभा घेत आश्वसानांचे हिंग जनतेमध्ये टाकलं. राज्यातील विविध विभागांतील 80 हजार पदे येत्या काही दिवसांत भरणार व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वाधिक मदत देणार, असे आश्‍वासन मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी दिलं.

CM Shinde's assurance in Hingoli Rally
हिंगोलीच्या सभेत CM शिंदेंनी टाकलं आश्वासनच हिंग  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • देशाचा अन्नदाता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल.- मुख्यमंत्री
  • मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी न्यायालयात विधीज्ञांची फौज उभी केली जाईल.
  • कळमनुरी येथील लमाणदेव तिर्थक्षेत्र, आदिवासी भवन यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी

हिंगोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सोमवारी मराठवाड्याच्या (Marathwada) दौऱ्यावर होते. हिंगोली (Hingoli)मध्ये जाहीर सभा घेत आश्वसानांचे हिंग जनतेमध्ये टाकलं. राज्यातील विविध विभागांतील 80 हजार पदे येत्या काही दिवसांत भरणार व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वाधिक मदत देणार, असे आश्‍वासन मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी दिलं. हिंगोलीतील महात्मा गांधी चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी नुकसानीची पाहणी केली आहे. देशाचा अन्नदाता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल. राज्यातील विविध विभागांमध्ये मोठ्या संख्येने रिक्तपदे असून आगामी काही दिवसांतच विविध विभागांतील 80 हजार पदे भरली जाईल.

दरम्यान एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांवरांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या गटातील शिवसैनिक नाराज आहेत. त्यांच्यावर गद्दराची आरोप करतात. याला मुख्यमंत्री शिंदे आपल्या दौऱ्याच्या माध्यमातून उत्तर देत आहेत. आतापर्यंत झालेल्या दौऱ्यांमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी त्याला उत्तर दिलं आहे. हिंगोलीत झालेल्या सभेतही बंडखोरीबाबत ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेवर शिंदे म्हणाले, मागील एका महिन्यापासून आम्हाला नवनवीन नावे देण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही कामातून त्यांना उत्तर देणार आहोत.

Read Also : आजचे राशीभविष्य: कसा असेल आजचा मंगळवार

राज्यात ठिकठिकाणी जाताना हजारोंच्या संख्येने जनता दुतर्फा उभे राहून प्रसन्न मुद्रेने आमचे स्वागत करताहेत. हेच त्यांना उत्तर आहे.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी न्यायालयात विधीज्ञांची फौज उभी केली जाईल. मराठा समाजाला न्याय देण्याचे काम शिवसेना-भाजपा युतीचे सरकार करणार असल्याचं सांगितलं. 

5 कोटींचा निधी

दरम्यान, कळमनुरी येथील लमाणदेव तिर्थक्षेत्र, आदिवासी भवन यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा एकनाथ शिंदे केली. तसेच ,औंढा नागनाथ व नर्सी नामदेवच्या विकासासाठी निधी देण्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच आमदार संतोष बांगर यांच्या कार्याचे त्यांनी कौतूक केले.

Read Also : India's Asia Cup 2022 : आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर

कावड यात्रेचे स्वागत

आमदार संतोष बांगर यांच्या वतीने कळमनुरी ते हिंगोली कयाधू अमृतधारा कावड यात्रा काढण्यात आली. यावेळी हजारो भाविक सहभागी झाले होते. या कावड यात्रेचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी