Nana Patole : राजीनामा दिल्यानंतर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा, माझ्यावेळी वीज आणि पाणी कपात केली होती, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

गुलाब नबी आझाद यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे तरी त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे, जेव्हा मी खासदारकीचा राजीनामा दिला तेव्हा माझ्या घरातील वीज आणि पाणी कपात केली होती अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच आझाद हे मोठे नेते आहेत यांच्याबद्दल बोलणे मला आवडणार नाही असेही पटोले म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • गुलाब नबी आझाद यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे तरी त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे,
  • जेव्हा मी खासदारकीचा राजीनामा दिला तेव्हा माझ्या घरातील वीज आणि पाणी कपात केली होती
  • अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

गुलाब नबी आझाद यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे तरी त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे, जेव्हा मी खासदारकीचा राजीनामा दिला तेव्हा माझ्या घरातील वीज आणि पाणी कपात केली होती अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच आझाद हे मोठे नेते आहेत यांच्याबद्दल बोलणे मला आवडणार नाही असेही पटोले म्हणाले. (congress leader nana patole criticized gulam nabi azad and bjp )

नागपुरात नाना पटोले यांच्या घरी गणपतीचे आगमन झाले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्षातून राजीनामा दिल्यानंतर गुलाम नबी आझाद हे सातत्याने भाषणबाजी करत आहेत. काँग्रेसकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे.  मी खासदार होतो आणि राजीनामा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी माझी पाणी-वीज कापली होती. आज गुलाम नबी आझाद यांना घरात कोणी नसतानाही सर्व सुविधा आणि झेड प्लस सुरक्षा मिळत आहे. तसेच मी 50 वर्षे सत्तेत होतो, त्यांनी किती पदे पत्रात लिहिली, हा त्यांचा विषय आहे. ते मोठे नेते आहेत, मला त्यांच्याबद्दल बोलायला मला आवडणार नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे. की मी स्वतः खासदार होतो, मी सुद्धा राजीनामा दिला तेव्हा दुस-या दिवशी पाण्याचे कनेक्शन कापले होते, वीज कनेक्शन कापले होते, आता आदरणीय नेते सभागृहाचे सदस्य नाहीत, तरीही त्यांना सर्व सुविधा, झेड प्लस सुरक्षा , ज्यांच्या आशीर्वादाने हे सर्व घडत आहे, त्यांनी त्यांचे नाव देखील घेतले आहे आणि स्वतःचे उत्तरही दिले आहे असेही नाना पटोले म्हणाले. तसेच काँग्रेस नेत्यांना काही अडचणी असेल तर वरिष्ठ नेत्यांशी बोला असे जाहीरपणे बोलणे योग्य नाही असेही पटोले म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी