Nana Patole : गांधी कुटुंबाला हात लावल्यास देशभरात जेलभरो आंदोलन करणार, काँग्रेस नेते नाना पटोले यांचा इशारा

भाजपचे केंद्र सरकार सर्व आघाडींवर अपयशी ठरले आहे, त्यामुळेच भाजप गांधी कुटुंबीयांना लक्ष्य करत आहे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. तसेच ईडीने गांधी कुटुंबीयांना हात लावल्यास जेलभरो आंदोलन करू असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.

थोडं पण कामाचं
  • भाजपचे केंद्र सरकार सर्व आघाडींवर अपयशी ठरले आहे,
  • त्यामुळेच भाजप गांधी कुटुंबीयांना लक्ष्य करत आहे
  • ईडीने गांधी कुटुंबीयांना हात लावल्यास जेलभरो आंदोलन करू

Nana Patole : नागपूर : भाजपचे केंद्र सरकार सर्व आघाडींवर अपयशी ठरले आहे, त्यामुळेच भाजप गांधी कुटुंबीयांना लक्ष्य करत आहे अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. तसेच ईडीने गांधी कुटुंबीयांना हात लावल्यास जेलभरो आंदोलन करू असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजप 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतपासून गांधी कुटुंबाला लक्ष्य करत आहे. आपले अपयश लपवण्यासाठी भाजपकडून गांधी कुटुंबाला लक्ष्य केले जात आहे. ज्या दिवशी तपास यंत्रणा गांधी कुटुंबाला ताब्यात देईल, त्या दिवशी संपूर्ण देश जेलभरो आंदोलन करेल. आणि हे आंदोलन आणि ही चळवळ महाराष्ट्रातून सुरू होईल असेही नाना पटोले म्हणाले. धनंजय मुंडे म्हणाले होते की महाराष्ट्राचा आगामी  मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल. यावर नाना पटोले म्हणाले की, प्रत्येकाला आस ठेवली पाहिजे, लोकशाहीत पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. काहींना दिवसाही स्वप्न पडतात, यावर काही बोलणार नाही असेही पटोले म्हणाले. 

राज्यसभा निवडणुकीवर पटोले म्हणाले की, बहुजन आघाडीसह सगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमचे नेते बाळासाहेब थोरात चर्चा करत आहेअसेह पटोले म्हणाले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वबूमीवर पक्षात सर्वांना पदं देणे शक्य नाही असे पटोले म्हणाले. त्यामुळे राज्यात पाच वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर असलेल्या ५१ जणांनी राजीनामा दिला आहे. पण आता आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका आहे. त्यामुळे या काळात नवीन अध्यक्ष नेमायचा का? की निवडणूकी पर्यंत यांना कायम ठेवावा? याबाबत हायकमांडशी चर्चा करणार असल्याचेही पटोले म्हणाले. 

कोरोना आला तर निवडणूक आयोग त्याबाबत निर्णय घेऊ शकतो, निवडणुकीचा कालावधी ठरलेला नाही, एखादी नैसर्गिक आपत्ती आली असेल तर निवडणुका मागेपुढे करण्याचा पूर्ण अधिकार आयोगाल आहे. तसेच ओबीसींचा इम्पेरीकल डाटा गोळा करण्याला वेग आला आहे, काँग्रेस याचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. जातिनिहाय जणगणनेसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे, वेळ आली तर विकास कामे बाजूला ठेवा आणि जातिनिहाय जनगणना करावी अशी भूमिकाही पटोले यांनी मांडली.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी