महाराष्ट्र हादरला ! घरात पूजा करत असताना सुनेकडून सासूची गोळ्या झाडून हत्या , पिस्तुलही आणली होती चोरून

daughter in law firing on mother in low : चारित्र्यावरून सासू सुनेला टोमणे मारत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यातूनच सुनेनं टोकाचं पाऊल उचलत सासूची हत्या केली.

daughter in law firing on mother in low
घरात पूजा करत असताना सुनेकडून सासूची गोळ्या झाडून हत्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सासू आशा आणि सून सरोज यांच्यात नेहमी शुल्लक कारणांवरून वाद होत
  • हत्तेनंतर सासू घरात पाय घसरून पडल्यानं मरण पावल्याचा बनाव सरोज हिनं रचला
  • सुनेने सेवानिवृत्त जेलर प्रभू गव्हाणकर यांच्या घरून पिस्तूल चोरली

यवतमाळ : सुनेने सासूवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे ही घटना घडली आहे. सासू – सुनेच्या घरगुती वादातून ही एक धक्कादायक घटना घडली आहे. सुनेने झाडलेल्या गोळ्यामुळे सासूचा मृत्यू झाला असून, सरोज पोरजवार असे आरोपी सुनेचे नाव आहे. तर सदर घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सासूचे नाव आशा पोरजवार असं आहे. आशा पोरजवार याचं वय ६० वर्षे इतक होत.

अधिक वाचा : ​किरीट सोमय्या ही भाजपची आयटम गर्ल - नवाब मलिक

सासू आशा आणि सून सरोज यांच्यात नेहमी शुल्लक कारणांवरून वाद होत

दरम्यानं, गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचं पहायला मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यात देखील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान, सासूची सुनेने हत्या केल्याची घटना देखील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरातील शिवाजीनर येथे घडली आहे. चारित्र्यावरून सासू सुनेला टोमणे मारत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. यातूनच सुनेनं टोकाचं पाऊल उचलत सासूची हत्या केली. त्याचबरोबर सासू आशा आणि सून सरोज यांच्यात नेहमी शुल्लक कारणांवरून वाद देखील होत होते. अरविंद पोरजवार या भाजी विक्रेत्याचं शिवाजीनर येथे घर आहे. घराच्या बाजूलाच त्याची आई आशा पोरजवार स्वतंत्र राहत होत्या.

अधिक वाचा : सारा अली खानसोबत घडला धक्कादायक प्रकार

हत्तेनंतर सासू घरात पाय घसरून पडल्यानं मरण पावल्याचा बनाव सरोज हिनं रचला

सुनेने सासू घरात पूजा करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुनेने सासू घरात पाय घसरून पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला असल्याचा बनाव रचला. मात्र, घटनेच्या थोड्या वेळातच सूनेने रचलेले बिंग फुटलं आणि गोळ्या झाडून सासूची हत्या केल्याचा बनाव  उघड झाला अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी दिली आहे. 

अधिक वाचा :  सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मिळणार 2 लाख रुपये

सुनेने सेवानिवृत्त जेलर प्रभू गव्हाणकर यांच्या घरून पिस्तूल चोरली

दरम्यान, सून सरोज हिनं ती राहत असलेल्या घराजवळ एक सेवानिवृत्त जेलर प्रभू गव्हाणकर राहत होते. सरोजने हत्येत वापरलेली पिस्तुल देखील गव्हाणकर यांच्या घरातून चोरली असल्याचं उघड झाल आहे. याप्रकरणी गव्हाणकर यांनी पिस्तूल चोरीची तक्रार पोलिसांत दिली आहे. सरोजनं चार दिवस ही पिस्तूल घरातच लपवून ठेवली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सरोज पोरजवार हिला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी