Death threat to Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, दाऊदच्या नावे फोन

नागपूर
भरत जाधव
Updated Jan 14, 2023 | 15:48 IST

नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात तब्बल तीनवेळा हा फोन आल्याची प्राथमिक माहिती आहे. या कारणास्तव त्यांच्या घराची तसेच कार्यालयाची सुरक्षा (Security) व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात लँडलाइन नंबरवर धमकीचे फोन कॉल आल्याची माहिती समोर आली आहे.

Death threat to Union Minister Nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पहिला कॉल आज सकाळी 11.28 मिनिटांच्या सुमारास आला होता.
  • जनसंपर्क कार्यालयात सकाळी साडेअकराच्या सुमारास धमकीचा कॉल आला.
  • या कॉलनंतर जनसंपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लगेच वरिष्ठ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

नागपूरः  केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याची बातमी आली आहे. नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात तब्बल तीनवेळा हा फोन आल्याची प्राथमिक माहिती आहे. या कारणास्तव त्यांच्या घराची तसेच कार्यालयाची सुरक्षा (Security) व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात लँडलाइन नंबरवर धमकीचे फोन कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. (Death threat to Union Minister Nitin Gadkari, phone call in Dawood's name )

अधिक वाचा  : Ghee Purity Check Tips: तुमच्या जेवणात बनवाट तूप तर नाही ना?

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील ऑरिक सिटी येथील कार्यालयात तीन कॉल आले. पहिला कॉल आज सकाळी 11.28 मिनिटांच्या सुमारास आला होता.  त्यानंतर 11 वाजून 35 मिनिटांनी तर 12 वाजून 32 मिनिटांनी तिसरा कॉल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा जनसंपर्क कार्यालयात पोहोचला असून पुढील तपास सुरू आहे.  या धमकीच्या कॉलमध्ये दाऊद या नावाचाही उल्लेख केल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच कॉलवर मला खंडणी द्या अन्यथा मी सोडणार नाही अशा आशयाची धमकी देण्यात आली. 

अधिक वाचा  :एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, पुण्यातील घटनेने खळबळ

या कॉलनंतर जनसंपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लगेच वरिष्ठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचा ताफा तपासासाठी गडकरींच्या कार्यालयात पोहोचला. सायबर सेललाही या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. 14 जानेवारी रोजी सकाळी तीनवेळा गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात धमकीचे फोन आले. त्यामुळे नागपूर पोलीस अलर्ट झाली आहे. सदर कॉल नेमके कुणी केले, यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे.  सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. स्थानिक पोलिसांसह अँटी टेररिझम स्क्वाड अर्थात एटीएसची टीमदेखील नागपुरात दाखल झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी