गर्भवती महिला अधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

deepali chavan sucide case : दीपाली चव्हाण यांची मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख होती. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

deepali chavan suicide case
गर्भवती महिला अधिकाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दोषी अधिकाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची कुटुंबाची ठाम भूमिका
  • मृतदेह पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाणार
  • शिवसेना नेते सुधीर सूर्यवंशी यांनी या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी केली

अमरावती : राज्यात कोरोनाचे (corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दरम्यान, अमरावती जिल्ह्यात देखील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच अमरावती जिल्ह्यातून (amaravati district) महाराष्ट्राला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत RFO (परिक्षेत्र अधिकारी) दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपाली चव्हाण या (परिक्षेत्र अधिकारीने) वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. (deepali chavan sucide case)

दोषी अधिकाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची कुटुंबाची ठाम भूमिका

दीपाली चव्हाण यांची मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख होती. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला  मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी दोषी असल्याचे बोलले जात आहे. जोपर्यंत या दोषी अधिकाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची कुटुंबाची आणि वनपाल-वनरक्षक संघटनेची भूमिका असल्याची माहिती समोर येत आहे.

मृतदेह पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाणार असल्याची माहिती आहे.

दीपाली चव्हाण या महिला अधिकाऱ्याने काल सायंकाळी ७ वाजता सरकारी बंगल्यात आपल्या बंदुकीच्या गोळ्या झाडून आत्महत्या केली. दोषी अधिकाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची कुटुंबियांची ठाम भूमिका असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दीपाली चव्हाण यांचा मृतदेह पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाणार असल्याची माहिती आहे.

शिवसेना नेते सुधीर सूर्यवंशी यांनी या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी केली

दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर तिची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंजच्या  RFO दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून केलेल्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात रेंजर असोसिएशन व शिवसेना नेते सुधीर सूर्यवंशी यांनी वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी केली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचामुळेच आत्महत्या केल्याची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून दीपाली यांना त्यांच्याच विभागातील वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचामुळेच आत्महत्या केल्याची चर्चा आहे. दीपाली या गर्भवती होत्या, त्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्य जीव परीक्षेत्रात त्या गेल्या दीड वर्षापासून RFO (वनपरिक्षेत्र अधिकारी) या पदावर कार्यरत होत्या. आज सायंकाळी साडे सात वाजता त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची बातमी उघड होताच परिसरात खळबळ उडाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी