Ajit Pawar : देशात वन नेशन वन टॅक्स लागू करा, पेट्रोल डिझेलवरी दर कमी करण्यासाठी अजित पवारांची केंद्र सरकारकडे मागणी

महाराष्ट्राने पेट्रोल डिझेलवरी कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलवर वन नेशन वन टॅक्स योजना लागू करावी अशी मागणी केली आहे. यासाठी पंतप्रधनानांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करून तोडगा काढावा असेही अजित पवार म्हणाले.

ajit pawar
अजित पवार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्राने पेट्रोल डिझेलवरी कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता.
  • त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलवर वन नेशन वन टॅक्स योजना लागू करावी अशी मागणी केली आहे.
  • यासाठी पंतप्रधनानांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करून तोडगा काढावा असेही अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar : नागपूर : महाराष्ट्राने पेट्रोल डिझेलवरी कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलवर वन नेशन वन टॅक्स योजना लागू करावी अशी मागणी केली आहे. यासाठी पंतप्रधनानांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करून तोडगा काढावा असेही अजित पवार म्हणाले. 

कायदा सुव्यवस्था महत्त्वाची

राज ठाकरे उद्या औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. त्यावर पवार म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी राज्यातली पोलीस सक्षम आहे. राजकीय सभा घेण्याचा  प्रत्येकाला अधिकार आहे. फक्त सभा घेत असताना त्यामुळे वातावरण खराब होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच सभा कशी असेल त्यात काय होणार हे सगळं विचारून पोलिसांनी परवानगी दिल्याचेही पवार म्हणाले. 

फडणवीसांनी राग मानू नये

मागच्या काळात पुण्यातला सर्किट हाऊस  मी उपमुख्यमंत्री असताना पूर्ण झाले होते अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या सर्किट हाऊसचे उद्घाटन केलं होते. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे सरकार येत असतात सरकार जात असतात त्यात एवढा फडणवीसांनी राग मानू नये असेही पवार म्हणाले.

विकास कामात राजकारण नको

सेंटर रोड फंड हा दरवर्षी केंद्र सरकार राज्यांना देत असतो. गेल्या वर्षी राज्याला १२०० कोटी रुपयांचा निधी मिळाला होता अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच गडकरी म्हणाले होते की 600 कोटी रुपयांचे काम महाविकासआघाडी सरकारने सुचवावे आणि 600 कोटींची  कामे भाजपच्या आमदारांनी सुचवावे. शेवटी महाराष्ट्रात बाराशे कोटी रुपयांचा केंद्राचा निधी आला म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी आणि सगळ्यांनी निर्णय घेतला. यातून भाजप आमदारांच्या क्षेत्रातील  काम आणि महाविकास आघाडीच्या आमदारांच्या क्षेत्रातील काम करायची आहे म्हणून ते पैसे आपण खर्च केले असे पवार म्हणाले. तसेच आता नवीन वर्ष सुरु झाले आहे त्यामुळे अशा प्रकारचा काही निधी आपण देऊ शकाल का? तो निधी  त्यांना थेट देता येत नाही केंद्राला राज्याला द्यावा लागतो आणि राज्य त्याचा वाटप  करतो. म्हणून समन्वय असावा, विकास कामात कुठे राजकारण येऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या घरी जाऊन चर्चा  केल्याचे पवार यांनी सांगितले. स्टेट हायवे मध्ये आरओबी आणि आरओयु  करायचा असेल तर ते नाव सुचवा असे आम्ही गडकरींना सांगितले.  तुम्हाला निधी देऊ काही रिंग रोडचे काम , रस्ते विकास महामंडळ आणि नॅशनल हायवे यांचा समन्वय साधून कशाप्रकारे काम करता येईल नवीन टेक्नॉलॉजी आली  ती टेक्नॉलॉजी कसे वापर करता येईल याविषयी गडकरींसोबत चर्चा  झाल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले. 

वन नेशन वन टॅक्स

राज्य सरकारने गॅस वरचा कर तीन टक्क्यांनी कमी केला आहे. सरकारच्या तिजोरी मध्ये येणारा टॅक्स गॅसचा दर महाराष्ट्रातील नागरिकांना परवडावा म्हणून आम्ही केला आहे. पेट्रोल डिझेलवरी दर स्थिर राहण्यासाठी देशात वन नेशन वन टॅक्स केंद्राने लावावा आणि जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या राज्याच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन केंद्राचा टॅक्स किती आणि राज्याचा किती या पद्धतीने विचार करता येतो तसा करावा अशी पवार म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी