BJP No. 1 : ...तरीही भाजपच नंबर वन! - फडणवीस

Devendra Fadanvis Congratulate BJP Workers : महाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भारतीय जनता पार्टी हा क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहील; असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis Congratulate BJP Workers
महाराष्ट्र, ...तरीही भाजपच नंबर वन! - फडणवीस 
थोडं पण कामाचं
  • ...तरीही भाजपच नंबर वन! - फडणवीस
  • भाजपच्या २४ आणि सहयोगी मिळून सर्वाधिक ३० नगरपालिकांमध्ये भाजपने सत्ता प्राप्त केली
  • ४१५ पेक्षा जास्त जागा जिंकत भारतीय जनता पार्टी हाच क्रमांक एकचा पक्ष

Devendra Fadanvis Congratulate BJP Workers : नागपूर : महाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भारतीय जनता पार्टी हा क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहील; असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपच्या २४ आणि सहयोगी मिळून सर्वाधिक ३० नगरपालिकांमध्ये भाजपने सत्ता प्राप्त केली. सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक ४१५ पेक्षा जास्त जागा जिंकत भारतीय जनता पार्टी हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे; असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळविलेल्या दणदणीत यशाचे शिल्पकार पक्षाचे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत; असे सांगत फडणवीस यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणाऱ्या मतदारांचेही फडणवीस यांनी आभार मानले. 

कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असल्याचे अधोरेखीत झाले; असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचेही आभार मानले. आभार मानण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी फडणवीस यांनी ट्विटर आणि फेसबुक या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर विशेष पोस्ट केल्या आहेत. 

नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल 2022

* कोणाच्या ताब्यात किती नगरपंचायती ? (आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार)

* एकूण नगरपंचायती-106

* निकाल स्पष्ट झालेल्या नगरपंचायती- 97

* निकाल बाकी असलेल्या नगरपंचायती- 9

* एकूण नऊ नगरपंचायतींचे निकाल उद्या लागणार

— ———————————————-

* भाजप- 25

* काँग्रेस- 21

* शिवसेना-17

* राष्ट्रवादी-27

* इतर-7

————————————————–

* महाविकास आघाडी- 64

* भाजप-25

* इतर- 7

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी