शब्द पाळायचा होता तर देसाई, रावते, शिंदे यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री करायचे होते - फडणवीस

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारांचं सोनं लुटण्याऐवजी गरळ ओकली.

devendra fadanvis slams uddhav thackeray dussehra rally speech
शब्द पाळायचा होता तर देसाई, रावते, शिंदे यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री करायचे होते - फडणवीस 
थोडं पण कामाचं
  • शब्द पाळायचा होता तर देसाई, रावते, शिंदे यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री करायचे होते - फडणवीस
  • दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारांचं सोनं लुटण्याऐवजी गरळ ओकली
  • निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भाजपच्या ७० टक्के आणि शिवसेनेच्या ४५ टक्के उमेदवारांना विजयी केले

नागपूर: दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारांचं सोनं लुटण्याऐवजी गरळ ओकली. उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द पाळायचा होता तर त्यांनी सुभाष देसाई, दिवाकर रावते किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी एका व्यक्तीला मुख्यमंत्री करायचे होते; असा टोला महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. devendra fadanvis slams uddhav thackeray dussehra rally speech

विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भाजपच्या ७० टक्के आणि शिवसेनेच्या ४५ टक्के उमेदवारांना विजयी केले. पण शिवसेनेने ज्यांना त्यांच्यापेक्षा कमी जागा मिळाल्या अशा दोन पक्षांसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. यामुळे हे बेईमानीने तयार झालेले सरकार आहे. 

मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा नव्हती तर नारायण राणे आणि राज ठाकरे यांना पक्षातून का बाहेर जावे लागले, असा सवाल फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला. उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द पाळायचा होता. मग त्यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारण्याऐवजी सुभाष देसाई, दिवाकर रावते किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री करायचे होते; असेही फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणतात आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे म्हणजे नक्की काय करायचे आहे, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. एकेकाळी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असलेल्या पश्चिम बंगालच्या कोलकाताची आजची स्थिती काय आहे. हत्या, खंडणी, युनियनबाजी यामुळे पश्चिम बंगालमध्ये एकही मोठा उद्योग टिकलेला नाही. विरोधात बोलणाऱ्याचे हात-पाय तोडणे, हत्या करणे हे प्रकार ज्या पश्चिम बंगालमध्ये होतात. महाराष्ट्रातही असे करायचे आहे का, असा सवाल फडणवीस यांनी केला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघराज्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला. ही व्यवस्था बदलण्याचा मनसुबा जाहीर केला. पण डाव्या विचारांच्या लोकांना हाताशी धरून सुरू असलेले हे उद्योग आम्ही यशस्वी होऊ देणार नाही; असे फडणवीस म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी