"उपमुख्यमंत्रिपद घेण्याची तयारी नव्हती पण..." शपथविधीपूर्वी नेमकं काय घडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं

Devendra Fadnavis in Nagpur: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात दाखल झाले. नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांचं भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत करत रॅली काढली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. 

Devendra Fadnavis explain what exactly happened before swearing in ceremoney he said i was not ready to take dycm post
"उपमुख्यमंत्रिपद घेण्याची तयारी नव्हती पण..." शपथविधीपूर्वी नेमकं काय घडलं? फडणवीसांनी सविस्तर सांगितलं  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने चांगला निर्णय घेतला - देवेंद्र फडणवीस 
  • उपमुख्यमंत्रिपद घेण्यात मला कमीपणा वाटत नाही - देवेंद्र फडणवीस  
  • चहावाला म्हणून ज्याला हिणवलं त्याने अनेकांना पाणी पाजलं - देवेंद्र फडणवीस

नागपूर : उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे प्रथमच नागपुरात पोहोचले. यावेळी देवेंद्र फडणवीसांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने बंडखोरी केल्याने राज्यातील मविआ सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलं की, एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील आणि मी सत्तेत सहभागी होणार नाही. मात्र, त्यानंतर तासाभरात सर्व चक्रे फिरली आणि दिल्लीहून फोन येताच देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, शपथविधीपूर्वी नेमकं काय घडलं? याबाबत सर्वांच्याच मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याच संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.

काय घडलं शपथविधीपूर्वी? 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि माझ्या संमतीने... हे प्रपोजल मी दिलं की, शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं पाहिजे आणि ते सर्वांनी मान्य केलं. फक्त त्यावेळी मी बाहेर राहीन असंच ठरलं होतं. ज्यावेळी राज्यपालांना पत्र देऊन पत्रकार परिषद झाली आणि ती करुन मी घरी गेलो. त्यावेळी माननीय नड्डाजी यांनी मला फोन करुन सांगितलं की माझा असा-असा विचार आहे. अमित शहाजी बोलले... त्यानंतर माझी तयारी त्यावेळेस नव्हती. कारण मी मानसिकता केली होती की, आपण बाहेर राहुन या सरकारला मदत केली पाहिजे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत चर्चा झाली आणि जे. पी. नड्डाजी यांनी तर पब्लिक स्टेटमेंट दिलं. या सर्वांचं मत होतं की, सरकार बाहेर राहुन चालत नाही. सरकार चालवायचं असेल तर सरकारमध्ये गेलं पाहिजे. वरिष्ठांच्या आज्ञेचं पालन करत मी निर्णय बदलल आणि उपमुख्यमंत्रिपदाची मी शपथ घेतली.

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली याचा मला कुठलाही कमीपणा नाही. एकनाथ शिंदे हे माझे सहकारी आहेत. आम्ही सोबत काम केलं आहे. आज ते नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत. माझं संपूर्ण सहकार्य त्यांना असणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून सफल झालेच पाहिजेत... आणि ते होतीलच... त्याकरता सर्वात जास्त योगदान मी देणार आहे. आम्ही दोघे मिळून विशेषत: महाराष्ट्राची जी गाडी पटरीवरुन खाली उतरली आहे ती पुन्हा पटरीवर आणू.

मोदीजींच्या नेतृत्वात देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य महाराष्ट्र हे केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. काँग्रेसने मोदीजींना चायवाला म्हणून हिणवले त्याच आमच्या पंतप्रधानांनी आज काँग्रेसला पाणी पाजले आहे. त्यामुळे कुणी आम्हाला रिक्षावाले म्हणून हिणवत असेल तर आम्हाला त्याचा आनंदच आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले नाही तर सामान्य माणूसच राज्य करेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी