नागपूर विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, "चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय भविष्यातील विजयाची नांदी" - फडणवीस

devendra fadnavis reaction on victory of bjp : महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सगळे विजय मिळू शकतात हे गणित मांडलं गेलं ते चुकीचं ठरलं आहे. महाराष्ट्रातील जनता भाजपच्या पाठिशी आहे, भविष्यातही आम्हाला आशिर्वाद मिळेल.

devendra fadnavis reaction on victory of bjp
"चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय भविष्यातील विजयाची नांदी" -   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद मला आज बावनकुळेंच्या विजयाने झाला – देवेंद्र फडणवीस
  • तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सगळे विजय मिळू शकतात हे गणित चुकीचे – फडणवीस
  • महाविकास आघाडीचे जवळपास ८०  मते फुटली असल्याचे समोर आले आहे

नागपूर : नागपूर पाठोपाठ अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकांचा निकाल हाती आला आहे. या दोन्ही मतदारसंघात भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान, या दोन्ही मतदारसंघात भाजपने महाविकासआघाडीला मोठा धक्का देत एक दोन नव्हे तर तब्बल ९६ मते  फोडली असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. हा निकाल महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, या निकालानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय भविष्यातील विजयाची नांदी आहे. असं म्हटलं आहे.

मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद मला आज बावनकुळेंच्या विजयाने झाला – देवेंद्र फडणवीस

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद मला आज बावनकुळेंच्या विजयाने झाला. बावनकुळेंच्या विजय महाविकास आघाडीला चपराक आहे." असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, त्यांनी नरेंद्र मोदी ,अमित शहा आणि नितीन गडकरी यांचे आभार देखील मानले आहेत.

तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सगळे विजय मिळू शकतात हे गणित चुकीचे – फडणवीस

महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सगळे विजय मिळू शकतात हे गणित मांडलं गेलं ते चुकीचं ठरलं आहे. महाराष्ट्रातील जनता भाजपच्या पाठिशी आहे, भविष्यातही आम्हाला आशिर्वाद मिळेल. चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय हा भविष्यातील विजयाची नांदी आहे. असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय मिळवला आहे. एकूणच विधानपरिषदेच्या ६ पैकी ४ जागी भाजप निवडून आली आहे. महाविकास आघाडीची मतं ही नागपूर आणि अकोल्यात मिळाली. ज्यांनी मतं दिली त्या सर्वांचे आभार मानतो", असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

महाविकास आघाडीचे जवळपास ८०  मते फुटली असल्याचे समोर आले आहे

अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना ३३४ मते मिळाली. महाविकास आघाडीचे जवळपास ८० मते फुटली असल्याचे समोर आले आहे. वसंत खंडेलवाल यांना ४४३ मते मिळाली. त्याशिवाय ३१ मते अवैध ठरली आहेत. नितीन गडकरींचे कट्टर समर्थक वसंत खंडेलवाल यांच्या विजयासाठी भाजपने प्रयत्न केले होते. अकोल्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि नितीन गडकरींचे कट्टर समर्थक वसंत खंडेलवाल यांच्या विजयासाठी भाजपने प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.  अकोला महापालिकेसह अनेक नगरपरिषदांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ताकद वाढलेली भाजपने ही निवडणूक सर्व ताकदनिशी लढवली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी