Devendra Fadnavis: 40 गाव सोडा... महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितले

Devendra Fadnavis reaction on Karnataka CM statement: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात समाविष्ट करण्याच्या संदर्भात वक्तव्य केलं. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर कर्नाटक दावा सांगण्याच्या तयारीत
  • या 40 गावांच्या ठरावाचा गांभीर्याने विचार करणार - कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
  • महाराष्ट्रातील एकही गाव कुठेही जाणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमा प्रश्न मार्गी काढण्यासाठी तसेच न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी राज्य सरकारने दोन मंत्र्यांची नियुक्ती केली. सीमा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन गांभीर्याने लक्ष घालत असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक मोठा दावा केला. महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात समाविष्ट करण्याच्या संदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला. या दाव्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकला प्रत्युत्तर दिलं आहे. (Devendra Fadnavis reaction over karnataka cm statement about maharashtras 40 villages will add in karnataka read in marathi)

2012 साली त्यांनी ठराव केला होता. आता नव्याने कुठल्याही गावाने कुठलाही ठराव केलेला नाही. 2012 साली आम्हाला पाणी मिळत नाही असं म्हणून त्यांनी ठराव केला होता. ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी कर्नाटकसोबत बोलून त्यांना जिथे पाणी हवं तिथे देऊ आम्हाला जिथे हवं तिथे त्यांनी द्यावं असा निर्णय केला होता. त्यानंतर म्हैसाळची जी सुधारित योजना आहे त्या योजनेत त्यांना घेण्याचा निर्णय आपले तत्कालीन मंत्री गिरिष महाजन यांनीही घेतला होता. तशी योजनाही तयार झाली होती. आता त्या योजनेला आपण मान्यता देणार आहोत. मधल्या काळात कोविडमुळे कदाचित मागील सरकार त्याला देऊ शकलं नसेल. पण आता त्याला तात्काळ मान्यता आम्ही देणार आहोत आणि तेथे पाणी पोहोचणार आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आपल्याला कल्पना असेल की, या सर्व योजनांना केंद्र सरकारने पैसा दिला आहे. पैशांची अडचण नाहीये. आता कोणीही अशी मागणी केलेली नाहीये, 2012 ची मागणी आहे. या सीमावादाच्या प्रश्नावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर आणि अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये सीमाभागातले आपली लोकं आहेत त्यांना पूर्ण मदत करण्याचं आपण ठरवलं. त्यांच्यासाठी सर्व योजना करायचं आपण ठरवलं. त्या सुरू होत्याच पण त्यासोबत इतरही योजना सुरू करण्याचं ठरवलं आणि त्यामुळेच कदाचित कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलं असावं.

हे पण वाचा : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असाल या गोष्टींची घ्या काळजी

महाराष्ट्रातील एकही गाव कुठे जाणार नाहीये. आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढून आपली बेळगाव, कारवार, निप्पाणीसह जी गावे आहेत ती सर्व मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आपण एका देशात राहतो त्यामुळे शत्रूत्व नाहीये हा एक कायदेशीर वाद आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी