देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला 'हा' प्रश्न

नागपूर
Updated Dec 18, 2019 | 16:57 IST

Devendra Fadnavis ask question to CM Uddhav Thackeray: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जामिया विद्यापीठातील घटनेवर भाष्य केलं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ शेअर करत प्रश्न विचारलाय.

devendra fadnavis share video ask question maharashtra cm uddhav thackeray jamia university jalianwala bagh massacre martyrs india marathi news
फाईल फोटो  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • जामिया विद्यापीठातील घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं भाष्य 
  • विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर गोळीबार, हे जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करुन देणारं - उद्धव ठाकरे
  • जामिया विद्यापीठातील घटनेसोबत तुलना करणं म्हणजे शहीदांचा अपमान - देवेंद्र फडणवीस

नागपूर: नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायद्याविरोधात दिल्लीसह ईशान्य भारतात जोरदार आंदोलने करण्यात येत आहेत. दिल्लीतील जामिया विद्यापीठात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला तर आंदोलकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचं समोर आलं. या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणावर भाष्य करत जामिया विद्यापीठातील घटनेची तुलना जालियनवाला बाग घटनेसोबत केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बाग घटनेसोबत जामिया विद्यापीठातील घटनेची तुलाना केल्याने यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं, "जामिया विद्यापीठातील घटनेची तुलना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बागशी करणे हा देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तमाम शहीदांचा अपमान आहे. जे नारे त्याठिकाणी दिले गेले, त्याच्याशी उद्धवजी सहमत आहेत का, याचे उत्तर त्यांनी कृपया देश आणि महाराष्ट्राला द्यावे!".

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

देशामध्ये अशांततेचं आणि अस्वस्थेतचं वातावरण निर्माण केलं जात आहे. होय, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरत आहे. काल ज्या पद्धतीने दिल्लीत कम्पाऊंटमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर गोळीबार केला जेणेकरुन जालियनवाला बागेतले दिवस परत आले की काय? जालियनवाला बागेत जो काही हिंसाचार घडला होता तसं वातावरण या देशात पुन्हा निर्माण केलं जातं की काय? असं भीतीचं वातावरण संपूर्ण देशात आणि युवकांच्या मनात निर्माण केलं जात आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ज्या देशांमध्ये युवक जिथे बिथरतो तो देश स्थिर राहू शकत नाही म्हणून मी केंद्र सरकारला सांगतो की तुम्ही युवकांना बिथरवू नका, युवक हे आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत, शक्ती आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...