तेव्हा कारवाई झाली असती तर... ;श्रद्धाच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य

Shraddha Walkar Murder: श्रध्दाच्या पत्राबाबत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी हे पत्र पाहिले आहे आणि त्यात खूप गंभीर आरोप आहेत. त्यावर का कारवाई झाली बाबत चौकशी करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

नागपूर : श्रद्धा हत्येप्रकरणी आफताब पूनावालाचा पोलिस तपास सुरू आहे. आफताबने कोर्टात श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली असली तरी पोलिसांचा तपास सुरू असून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. ताजी बातमी म्हणजे हत्येपूर्वी श्रद्धाने लिहिलेली चिठ्ठी समोर आली आहे. (Devendra Fadnavis's big statement on Shraddha's complaint)

अधिक वाचा : Nashik: नाशिककरांनी पहिल्यांदाच बिबट्या पाहिला वाटतं?

वसई पोलिसांना लिहिलेल्या या पत्रात श्रद्धाने तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाच्याकडून होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितले होते. आफताब आपल्याला मारहाण करत होता आणि जीवे मारण्याची धमकी देत ​​असल्याचा आरोप श्रद्धाने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात केला होता. श्रद्धाने तिच्या पत्रात पुढे लिहिले आहे की, 'मला काही झाले तर ते कोणी केले आहे हे तुम्हाला कळलेच पाहिजे.'

अधिक वाचा : Devendra Fadnavis: 40 गाव सोडा... महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितले

आता या पत्रावरून महाराष्ट्रातही राजकारण सुरू झाले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2020 मध्ये श्रद्धाने लिहिलेल्या पत्राची चौकशी करून कारवाई का झाली नाही, याचा शोध घेऊ, असे म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी