नागपूर : नागपूरच्या ग्रामीण भागातील कामठी येथे अंत्यसंस्कार सुरू असताना अचानक झालेल्या अपघातात २ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर एक जण गंभीर जखमी झाला, अग्नी देताना आगीच्या ज्वाळांमुळे ही दुर्घटना घडली असून त्यात तीन जण जखमी झाले आहेत. आगीत लोक गंभीररित्या भाजले गेले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरला रेफर करण्यात आले, त्यानंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला, काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास नया कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत राणी मोक्षधाम घाट येथे मृत्यू झाला. (Diesel catches fire during funeral in Kamthi, Nagpur, 2 killed, 1 injured)
अधिक वाचा :
सुधीर डोंगरे आणि दिलीप गजभिये यांना गंभीर अवस्थेत नागपूरच्या मेयो शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला, तर सुधाकर खोब्रागडे यांच्यावर कामठी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कामठी येथील रहिवासी सिद्धार्थ हुमणे यांचा मृत्यू झाला होता. सिद्धार्थ यांच्यावर दुपारी कामठी येथील राणीतालाब मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लाकूड ओले असल्याने अंत्यविधीच्या वेळी डिझेल फवारण्यात आले. दरम्यान अचानक आग पेटली आणि हा अपघात झाला आहे.