कुत्र्याच्या अपघातानंतर मिळाली तीन लाखाची नुकसानभपाई, ८ वर्षानंतर न्यायालयाने दिला निकाल, कुत्रा करायचा नोकरी!

dog accident case in chandrapur : अय्यप्पा मंदिराजवळ आपल्या लाडक्या कुत्र्याला फिरवत होते. तेवढ्यात भरधाव असलेल्या स्कूल बसने गोपाल दूध डेअरीच्या जवळ जॉनला धडक दिली. यामध्ये जॉनचा जागीच मृत्यू झाला होता.

dog accident case in chandrapur
कुत्र्याच्या अपघातानंतर मिळाली तीन लाखाची नुकसानभपाई   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अपघातास जबाबदार असलेल्या व्यक्तीने कुत्र्याच्या मालकाला तीन लाख रुपयांची भरपाई
  • कुत्र्याच्या मालकाने एक दोन नव्हे तर तब्बल ८ वर्षे न्यायालयीन लढाई लढली
  • मालक भटकर यांनी ५ लाख रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती.

चंद्रपूर : जर एखादे कुत्याचे निधन अपघाताने झाल्यास त्याकडे कोणी तेवढ फारसं लक्ष देत नाही. मात्र, अपघाती मृत्यूनंतर मालकाला लाखो रुपये मिळाल्याची घटना घडली आहे. एखाद्या कुत्र्याच्या अपघाती मृत्यूनंतर भरपाई मिळण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कुत्र्याच्या अपघातास जबाबदार असलेल्या व्यक्तीने कुत्र्याच्या मालकाला तीन लाख रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस. जे. अंसारी यांनी दिला आहे. या प्रकरणातील कुत्र्याच्या मालकाचे नाव उमेश भटकर आहे तर कुत्र्याचे नाव जॉन असे होते.

नेमकं काय घडली होती घटना?

चंद्रपुरात रस्त्यावरील एका कुत्र्याला बसने उडवले होते. या अपघातात कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला होता. सदर कुत्र्यावर मालकाचे अफाट प्रेम होते. त्यामुळे, कुत्र्याचा मृत्यू झाल्याने कुत्र्याच्या मालकाला मालकाला खूप दुःख झाले. आणि आपल्या कुत्र्याला न्याय मिळवून द्यायचा असं मालकाने ठरवले.  आणि एक दोन नव्हे तर तब्बल ८ वर्षे न्यायालयीन लढाई लढली आणि अखेर आपल्या कुत्र्याला न्याय मिळवून दिला. असून, अपघाताला दोषी असलेल्या बसचालक आणि इन्शुरन्स कंपनीकडून तीन लाख रुपये भरपाई मिळवली. चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच घडले असं बोललं जात आहे.

असा झाला होता अपघात?

मेसर्स रहीम ट्रॅव्हल्सच्या बस क्रमांक एम एच ४० एन ३७६६ ने हा अपघात झाला होता. चंद्रपूर शहरातील तुकुम येथील रहिवासी उमेश भटकर १० जानेवारी २०१३ ला सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी हा अपघात झाला होता. अपघात झाला यावेळी कुत्र्याचे वय ११ महिने होते. अय्यप्पा मंदिराजवळ आपल्या लाडक्या कुत्र्याला फिरवत होते. तेवढ्यात भरधाव असलेल्या स्कूल बसने गोपाल दूध डेअरीच्या जवळ जॉनला धडक दिली. यामध्ये जॉनचा जागीच मृत्यू झाला होता.  यानंतर भटकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान ,सदर घटनेनंतर जॉनचे शवविच्छेदनही करण्यात आले होते. शवविच्छेदन अहवालानुसार जॉनचा अपघातात मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

मालक भटकर यांनी ५ लाख रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती.

हे प्रकरण न्यायालयात तब्बल ८ वर्ष चालले. अखेर उमेश भटकर यांच्या बाजूने निकाल देण्यात आला. भटकर यांनी ५ लाख रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, १.६२ लाख रुपये आणि त्यावर ८ टक्के दराने व्याज भटकर यांना द्यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले. ॲड. जयप्रकाश पांडेय यांच्या माध्यमातून मोटर ॲक्सीडेंट क्लेम्स ट्रिब्यूनल, चंद्रपूरमध्ये प्रकरण दाखल केले. यामध्ये बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रहीम ट्रॅव्हल्स बस कंपनी आणि बसचालक सुधाकर थेरे या तिघांना दोषी धरले होते.

जॉन नामक हा कुत्रा आरती इन्फ्रा कंपनीमध्ये नोकरी करीत होता

जॉन नामक हा कुत्रा आरती इन्फ्रा कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करीत होता. असं जॉनचा मृत्यू झाल्यानंतर अपघात दावा देण्याचा आदेश मोटर ॲक्सीडेंट क्लेम्स ट्रिब्यूनल, चंद्रपूर ने दिला आहे.  मालक भटकर यांना त्याचे ८००० रुपये प्रतिमहिना वेतन मिळत होते. स्कूल बसचालकाच्या बेपरवाहीमुळे जॉनचा मृत्यू झाला. परिणामी भटकर यांचे दर महिन्याला ८०००  रुपयांचे नुकसान होत होते. भटकर यांनी बसचे मालक आणि इन्शुरन्स कंपनीकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी