Dr Prashant Bokare डॉ प्रशांत बोकारे यांची गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती 

Dr Prashant Bokare to be new Vice Chancellor of Gondwana University Gadchiroli डॉ प्रशांत श्रीधर बोकारे यांची गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आले आहे.

Dr Prashant Bokare to be new Vice Chancellor of Gondwana University Gadchiroli
डॉ प्रशांत बोकारे यांची गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती  
थोडं पण कामाचं
  • डॉ प्रशांत बोकारे यांची गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती 
  • राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केली घोषणा
  • मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी केली निवड

Dr Prashant Bokare to be new Vice Chancellor of Gondwana University Gadchiroli मुंबईः डॉ प्रशांत श्रीधर बोकारे यांची गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आले आहे.

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी सध्या ओ.पी.जिंदाल विद्यापीठ, रायगड, छत्तीसगड येथील स्कुल ऑफ इंजिनीअरिंग येथे प्राध्यापक व अधिष्ठाता असलेल्या डॉ प्रशांत बोकारे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.   डॉ प्रशांत बोकारे यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. 

दिनांक  ७ सप्टेंबर २०२० रोजी गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. 

डॉ प्रशांत बोकारे (जन्म २३ नोव्हेंबर १९६३) यांनी सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली येथून स्थापत्य अभियांत्रिकी ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी नागपूर येथील व्हीआरसीई येथून एम. ई. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली व आयआयटी  गुवाहाटी येथून पीएच.डी. प्राप्त केली. त्यांना अध्यापन व संशोधनाचा व्यापक अनुभव आहे.
 
डॉ बोकारे यांनी बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय सेवाग्राम वर्धा येथे तसेच रुंगटा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे प्राध्यापक व प्राचार्य पदावर काम केले आहे.  

कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी अलाहाबाद उच्च न्यायालय येथील सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिति गठित केली होती. इंडियन इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट इंदोर येथील संचालक प्रा. हिमांशू राय व शासनाचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता या समितीचे सदस्य होते.  

समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ प्रशांत बोकारे यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी